राजापुरातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:59+5:302021-05-05T04:52:59+5:30
राजापूर : शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, सोमवारी शहरातील एस.टी. डेपो, गुरववाडी परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत एकाचवेळी २० जणांचे ...
राजापूर : शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, सोमवारी शहरातील एस.टी. डेपो, गुरववाडी परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत एकाचवेळी २० जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्वांना तत्काळ उपचारासाठी रायपाटण कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तशी माहिती नगर परिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
या परिसरातील १४ घरांची तपासणी करण्यात आली असून, हा परिसर कंटेन्टमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८४ वर गेला आहे.
रविवारी राजापूर शहरात एस.टी. डेपो, गुरववाडी व बंगलवाडीत दोनजणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. यानंतर तत्काळ नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभागातर्फे या भागात सर्वेक्षण करून तपासणी करण्यात आली. या भागात ११६ जणांची अॅन्टिजेन तपासणी करण्यात आली. त्यात २० जण पॉझिटिव्ह आले आहेत. एस.टी. डेपो, गुुरववाडी भागातील कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाने एका लग्नसमारंभात हजेरी लावली होती. त्यामुळे या परिसरातील १४ घरांतील व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बंगलवाडी येथील त्या मृत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांना होमआयसाेलेट करण्यात आले आहे.