कोरोना रुग्णांची संख्या घटली, केवळ ४४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:34 AM2021-09-27T04:34:58+5:302021-09-27T04:34:58+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात घट झाली असून दिवसभरात केवळ ४४ रुग्ण सापडले आहेत, तर ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत माेठ्या प्रमाणात घट झाली असून दिवसभरात केवळ ४४ रुग्ण सापडले आहेत, तर दोघांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. नवीन रुग्ण आढळण्याच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असून दिवसभरात ६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाचे नवीन रुग्णांचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, तसेच रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्याही घटली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्याही कमी झाल्या असून, दिवसभरात केवळ २,४६० लोकांची चाचणी करण्यात आली. त्यात मंडणगड तालुक्यात एकही कोरोनाबाधित सापडलेला नाही, तर दापोली तालुक्यात ५ रुग्ण, खेडात ३, गुहागरात ६, चिपळूणमध्ये १४, रत्नागिरीत १० आणि संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत. बाधित एकूण ७७,७२६ रुग्ण झाले आहेत.
जिल्ह्यात ७४,६०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के आहे. रत्नागिरी तालुक्यातील २ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण ३.११ टक्के आहे. जिल्ह्यात ७०३ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.