रुग्ण वाढल्याने जयसिंग माने यांची काेविड सेंटरला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:32+5:302021-04-21T04:31:32+5:30

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भागात तब्बल ५५ जण पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाढत्या रुग्ण संख्येची दखल ...

As the number of patients increased, Jaysingh Mane visited Kavid Center | रुग्ण वाढल्याने जयसिंग माने यांची काेविड सेंटरला भेट

रुग्ण वाढल्याने जयसिंग माने यांची काेविड सेंटरला भेट

Next

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा भागात तब्बल ५५ जण पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाढत्या रुग्ण संख्येची दखल पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने यांनी घेतली असून, दख्खनसह देवरुख कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी करत यंत्रणेला सूचना दिल्या.

मागील काही दिवसांमध्ये दख्खन गावासह साखरपा परिसरात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या गावातील लक्षणे असणाऱ्या नागरिकांची तपासणी सोमवारी केली असता, हा धक्कादायक आकडा समोर आला. यामुळे स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मंगळवारी सकाळीच पंचायत समिती सभापती जयसिंग माने यांनी या गावाला भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोविड सेंटरला भेट देऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी स्थानिक प्रशासनाला परिसर निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिली. या भेटीदरम्याने संगमेश्वर तालुका तहसीलदार सुहास थोरात उपस्थित होते. काेणीही विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच कोणत्याही जीवनाश्यक वस्तूंची गरज लागल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, उपतालुकाप्रमुख काका कोलते, पंचायत समिती गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, आरोग्य विस्तार अधिकारी एच. एस. जाधव, माजी सरपंच मंगेश दळवी, विठोबा फोंडे, आरोग्य पर्यवेक्षक दत्तात्रय भस्मे उपस्थित होते.

Web Title: As the number of patients increased, Jaysingh Mane visited Kavid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.