दापाेली तालुक्यातील काेराेनाची रुग्णसंख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:25+5:302021-05-05T04:52:25+5:30
दापोली : गेल्या काही दिवसात तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांनी ...
दापोली : गेल्या काही दिवसात तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांनी शंभरी गाठली होती, त्यामुळे दापोली तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला होता. तालुक्याचा मृत्यूदरही वाढला होता. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले हाेते.
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दापोली तालुक्यातील कोराेनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे. परंतु अजूनही मृत्यूचा दर मात्र कायम आहे. त्यामुळे एकीकडे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही, दुसरीकडे मात्र मृत्यूचा दर कमी न झाल्याने चिंता कायम आहे. गावा-गावात लोक आता जागरूक बनले आहेत. प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण सुद्धा केले जाणार आहे. त्यामुळे गावातील बाधित कुटुंबे समोर येणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे.
तालुक्यातील गावा-गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने गावकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. संक्रमण रोखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी स्वीकारल्यास व नियमांचे पालन केल्यास ग्रामीण भागातील काेराेना आटोक्यात येण्यास मदत हाेणार असल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.