गुहागरात २४ जून रोजी ओबीसींचे आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:37+5:302021-06-19T04:21:37+5:30
आबलोली : ओबीसींच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे गुहागर तहसील कार्यालयासमाेर आक्राेश ...
आबलोली : ओबीसींच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीतर्फे गुहागर तहसील कार्यालयासमाेर आक्राेश आंदाेलन करण्यात येणार आहे़ हे आंदाेलन २४ जून राेजी सकाळी ११ वाजता हाेणार आहे़
जातनिहाय जनगणना करणे,पदोन्नतीच्या कोट्यातील मागासवर्गीयांची ३३ टक्के आरक्षित पदे भरण्यात यावीत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द न होता ते अबाधित राहिले पाहिजे याची दक्षता व कार्यवाही राज्य शासनाने करावी, याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आक्रोश निदर्शन आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात तालुका समिती आणि जिल्हा परिषद गटांच्या उपसमितींच्या पदाधिकारी, सल्लागार, ओबीसी पत्रकार व लोकप्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष पांडुरंग पाते, सचिव नीलेश सुर्वे यांनी केले आहे.