गुहागरात ओबीसीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:13+5:302021-06-25T04:23:13+5:30
गुहागर : ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा व जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी व घोषणा करत ओबीसी संघर्ष समन्वय ...
गुहागर : ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा व जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी व घोषणा करत ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागरतर्फे निदर्शने करण्यात आली़ यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार गुहागर यांना देण्यात आले़
समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते म्हणाले की, सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर हे आंदोलन जनआंदोलन करण्यात आली येईल़ ही लढाई प्रामुख्याने तरुणांसाठी असून, या आंदोलनात केंद्रबिंदू तरुण असला पाहिजे तरुणांनी मनावर घेतले तर या आंदोलनाचे स्वरूप, उद्देश साध्य होईल़ या आंदोलनात विविध पक्षांच्या विविध पक्षांच्या पदाधिकारी प्रतिनिधींचा समावेश आहे़ त्यांनी आरक्षणाबाबत पक्ष भूमिकेवर लक्ष ठेवून राहिले पाहिजे. यावेळी सचिन बाईत, राजेश बेंडल, विलास पागडे, नेत्रा ठाकूर, पूर्वी निमुणकर, विलास वाघे, दत्ताराम निकम, विलास गुरव, पूजा कारेकर, वैभव वेल्हाळ, नरेश पवार उपस्थित होते़
-----------------------
ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी गुहागर तहसील कार्यालयासमाेर गुरुवारी निदर्शने करण्यात आली़