वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:27 AM2021-04-05T04:27:27+5:302021-04-05T04:27:27+5:30

तटरक्षक दलाच्या ताफ्यात नवीन बोटी रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या आयसीजीएस अग्रीम व आयसीजीएस-अचूक या दोन अत्याधुनिक यंत्रणांनी ...

Obstruction of traffic | वाहतुकीला अडथळा

वाहतुकीला अडथळा

Next

तटरक्षक दलाच्या ताफ्यात नवीन बोटी

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या आयसीजीएस अग्रीम व आयसीजीएस-अचूक या दोन अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज व वेगाने मार्गक्रमण करू शकणाऱ्या बोटी आणल्या असून तटरक्षक दलाच्या ताफ्यात त्या दाखल झाल्या आहेत. जिल्ह्याची सागरी सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी बोटी आणण्यात आल्या आहेत. दापोली ते मांडवा सागरी सुरक्षा प्रभावी होणार आहे.

पर्यटनासाठी कोकणचे संकेतस्थळ

रत्नागिरी : पर्यटनाला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने कोकणातील पर्यटनासाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी केली आहे. यासाठी कृषी आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच पर्यटनासंदर्भातील कोकणासाठी खास संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे.

आजपासून शहरात पाणीपुरवठा नाही

रत्नागिरी : नगरपरिषदेतर्फे शहरामध्ये सोमवार दि. ५ व मंगळवार दि. ६ एप्रिल रोजी पाणी पुरवठा होणार नसल्याचे घोषित केले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणावरील पंपिंग यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवला जाणार आहे.

माती परीक्षण थेट शिवारात

रत्नागिरी : मृदा पत्रिकेद्वारे मातीचे आरोग्य तपासून त्याप्रमाणे पीक परिस्थिती हाताळण्यासाठी कृषी विभागातर्फे थेट शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वत: शेतकरीच आपल्या जमिनीची सुपीकता ओळखून त्याप्रमाणे उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षित होणार आहेत.

शिमगोत्सव साधेपणाने साजरा

आरवली : माखजन व आरवली परिसरात शिमगोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना रुग्णवाढीमुळे शासनाच्या निर्बंधांचे पालन करीत मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोंडिवरे येथील शाहमहमद शाह पीर यांचा वार्षिक उरूसही साधेपणाने साजरा करण्यात आला.

रस्ता दुरुस्तीची मागणी

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी-मुचरी ते वाशी सहाणेपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. अन्यथा ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

हळद लागवड प्रशिक्षण

गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे हळद लागवड प्रशिक्षण देण्यात आले. प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यांनी विकसित केलेल्या स्पेशल कोकण ४ या हळद पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

रस्ता दुरुस्तीसाठी प्रतीक्षा

रत्नागिरी : सागरी महामार्गावरील आरेवारेमार्गे गणपतीपुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डयांतून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार मागणी करूनसुध्दा रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

साथीचा प्रादुर्भाव

रत्नागिरी : उष्मा वाढला असून पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्दी, पडसे, तापसरी, डोकेदुखी, उलटी, जुलाबाने लोक त्रस्त झाले आहेत. कोरोनामुळे रुग्णालयात जाणे टाळत असून, घरीच औषधोपचार करीत आहेत.

Web Title: Obstruction of traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.