अधिकाऱ्यांची चौकशी

By admin | Published: February 22, 2015 10:56 PM2015-02-22T22:56:20+5:302015-02-23T00:22:51+5:30

अनिल शिगवण : खेडच्या शेतकरी मेळाव्याला अनेकांची दांडी

Officers' inquiry | अधिकाऱ्यांची चौकशी

अधिकाऱ्यांची चौकशी

Next

खेड : शेतकऱ्यांचे हित साधताना कोणतीही तडतोड केली जाणार नाही. मेळाव्याला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती डॉ. अनिल शिगवण यांनी दिले.
भरणे येथील वारकरी मठामध्ये खेड तालुका भुमिपूत्र शेतकरी संघाच्या वर्धापनदिनानिमित्त संघाच्यावतीने तालुकास्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी अध्यक्षस्थानावरून अनिल शिगवण बोलत होते.
शेतकऱ्यांचे हित साधताना कोणतीही तडतोड केली जाणार नाही. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन देत कृषी विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहिती मिळवून शेतकऱ्यांनी आपला उत्कर्ष साधावा, असे आवाहन त्यांनी केले. अनेक शेतकरी शेतीसंबंधित काम घेऊन गेल्यावर हेच अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात. काही वेळेला विविध कारणे देत काम होणार नसल्याचे सांगितले जात असल्याने आधुनिक शेती करताना अडथळे येत असल्याचे या शेतकऱ्यांनी आमदार संजय कदम आणि डॉ़ अनिल शिगवण यांना सांगितले. यावर डॉ़ अनिल शिगवण यांनी नाराजी व्यक्त करीत यापुढे कडक धोरण अवलंबणार असल्याचे सांगितले. या शेतकरी मेळाव्याला अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत यावेळी डॉ. शिगवण यांनी दिले.
याशिवाय पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या योजना याविषयी डॉ. शिगवण यांनी उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले. शेतकरी देशाचे सर्वस्व असून, शेतकऱ्यांसाठी विविध सवलतींच्या माध्यमातून प्रगती करणे आवश्यक असल्याचा सूर आमदार संजय कदम यांनी आळवला. आपण स्वत: एक शेतकरी आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दु:ख आपण समजू शकतो.
संस्थेचे संस्थापक व कार्याध्यक्ष वसंत गुरव यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष नितीन आंब्रे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि न्याय हक्कांसाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या सवलतीच्या योजना शेतकऱ्यांना योग्यरितीने समजावून सांगा, असे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
या शेतकरी मेळाव्याला खेडचे प्रांताधिकारी जयकृष्ण फड, तहसीलदार प्रकाश संकपाळ, आवाशी येथील मृदसंधारण विभागाचे संशोधक वैभव शिंदे, उपसभापती रवींद्र मोरे, माजी उपसभापती रामचंद्र आईनकर, पंचायत समिती सदस्य सचिन दळवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Officers' inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.