'कार्तिकी एकादशी' निमित्त उदय सामंतांनी घेतले पांडुरंगाचे दर्शन
By अरुण आडिवरेकर | Published: November 4, 2022 09:52 AM2022-11-04T09:52:12+5:302022-11-04T10:43:43+5:30
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आज, शुक्रवार (दि.४) रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत.
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सकाळी रत्नागिरीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेतले. विठ्ठलाची मनोभावे दर्शन घेऊन त्यांनी सर्वांना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आज, शुक्रवार (दि.४) रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सकाळी ११ वाजता पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत जनता दरबारही भरविण्यात आला आहे.
या दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी मंत्री सामंत यांनी 'कार्तिकी एकादशी'निमित्त रत्नागिरीतील श्री विठ्ठल मंदिराला भेट दिली. त्यांनी मंदिरात पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी सर्व वारकरी बांधवांना व भाविकांना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच मंदिर व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.