सावित्री नदीवरील आंबेत-म्हाप्रळ पूल कोसळण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 04:40 PM2022-02-13T16:40:33+5:302022-02-13T16:41:03+5:30
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील महाड सावित्री नदीवरील ब्रिटिश कालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता , याच सावित्री नदीवरील आणखी एक आंबेत - म्हाप्रळ पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे.
- शिवाजी गोरे
रत्नागिरी - रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील 2 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील महाड सावित्री नदीवरील ब्रिटिश कालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 40 निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता , याच सावित्री नदीवरील आणखी एक आंबेत - म्हाप्रळ पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे.
महाड सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर याच सावित्री नदीवरील आंबेत म्हाप्रळ नावाचा आणखी एक पूल धोकादायक बनला असून , हा पूल वाहतूकीस कमकुवत बनला असून, कोसळण्याच्या मार्गावर आहे . महाड दुर्घटनेनंतर या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती आंबेत पुलाचे काम 6 महिन्या पूर्वीच पूर्ण झाले होते , सुमारे 12 कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात आली आहे. तरीही पूल एका बाजूला झुकला आहे ,तसेच पुलाचा एक पिलर सरकल्याने सावित्री नदीवरील आंबेत - महाप्रळ पुलाला धोका निर्माण झाला आहे , कमकुवत झालेला पूल कधीही कोसळू शकतो, असा दावा केला जात आहे ,या पुलावरून अवजड वाहतुक बंद करण्यात आली आहे .
रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा व मुंबईसाठी जवळचा पर्यायी मार्ग म्हणून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे कारकीर्द पुलाला मंजुरी मिळाली , रायगड आंबेत व रत्नागिरी म्हाप्रळ सावित्री नदीवर बांधण्यात आला .या पुलामुळे मुबंई चे अंतर कमी होऊन दोन्ही जिल्ह्यातील दळणवळणाची सोय झाली , विशेष म्हणजे 6 महिन्यापूर्वीच 12 कोटी रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती . परंतु हा पूल वाहतुकीला कमकुवत बनल्याने शासनाचे कोटयवधी रुपये गेले कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाड सावित्री नदीवर या पूर्वी दुर्दैवी घटना घडून अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले होते , आशा प्रकारची घटना टाळण्यासाठी आंबेत - म्हाप्रळ पूल वाहतुकीला बंद करण्यात आला आहे , तज्ञ मंडळीकडून या पुलाचा सर्वे करण्यात आला असून हा पूल अतिशय धोकादायक बनला आहे वाहने पेलण्याची क्षमता शिल्लक राहिली नाही त्यामुळे या पुलाचा पुनर सर्वे करून दुरुस्ती केली जाईल तसेच पर्यायी पूल सुद्धा उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार सुनील तटकरे म्हणालेतय सावित्री नदीवरील आंबेत पुलाची पाहणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे तज्ञ मंडळीच्या लक्षात आले आहे , पुलाचा दोन नंबरचा पिलर भरती ओहोटीच्या वेळी दोन इंच ते 4 इंच सरकत असल्याचे सर्व्हेतुन समोर आले आहे ,त्यामुळे पूल कधीही कोसळू शकतो अस बोललं जातं आहे.
आंबेत -म्हाप्रळ ब्रिज खाली सक्शन पंपाद्वारे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याने पिलर चा सपोर्ट कमी झाला आहे, तसेच एक पिलर भरती ओहोटीच्या वेळी जागा सोडत असून, किंचित हालत आहे , संपूर्ण ब्रिज कधीही पडू शकतो , वारंवार तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे
सावित्री नदीवरील धोकादायक बनलेला पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असल्याने इतर वाहतूकदार प्रमाणेच स्थानिक स्थानिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे तसेच लांबच्या मार्गाने वाहने घेऊन जावे लागत आहे त्यामुळे अंतर वेळ वाढले आहे तर दोन्ही जिल्ह्यातील दळणवळण ठप्प झाल्याने स्थानिकांची मोठी गैरसोय सुरू आहे.
सावित्री नदीवरील पूल कोसळून अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले होते , या नदीवरील 376 मीटर लांबीचा आंबेत -म्हाप्रळ पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे . लोकांच्या जिवीताचा धोका लक्षात घेऊन या पुलाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे