पूरग्रस्त आशा स्वयंसेविकांना ऑन्को लाईफ केअर सेंटरचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:48+5:302021-08-13T04:35:48+5:30
चिपळूण : गेल्या काही आठवड्यांपूर्वी कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. कोकणातील या पूरग्रस्तांकरिता मदतीचा हात म्हणून ...
चिपळूण : गेल्या काही आठवड्यांपूर्वी कोकणात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. कोकणातील या पूरग्रस्तांकरिता मदतीचा हात म्हणून चिपळूण ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरतर्फे कोकणातील आशा स्वयंसेविकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. ५८६ आशा स्वयंसेविकांना या उपक्रमांतर्गत मदत करण्यात आली.
आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याकरिता ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरने खारीचा वाटा उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून आशा सेविकांना मदत करण्यात आली आहे. आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे यादृष्टीने आशा स्वयंसेविका महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात. त्यासाठीच त्यांना मदतीचा हात देण्यात आला.