राजापुरात उद्यापासून एक दिवस पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:33 AM2021-04-04T04:33:04+5:302021-04-04T04:33:04+5:30

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्य:स्थितीत ...

One day water from tomorrow in Rajapur | राजापुरात उद्यापासून एक दिवस पाणी

राजापुरात उद्यापासून एक दिवस पाणी

Next

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली धरणातील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सद्य:स्थितीत कोदवली धरणातून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सोमवार, दि. ५ एपिलपासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार आहे.

राजापूर शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ जॅकवेल व कोदवली येथील सायबाचे धरण असे दोन नैसर्गिक स्त्राेत आहेत. त्यापैकी कोदवली येथील सायबाच्या धरणावरून कमी खर्चामध्ये शहराला पाणी पुरविता येते. गेल्या काही वर्षांतं धरणाला माेठ्या प्रमाणात गळती लागली असून, धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळही साचला गेला आहे. परिणामी धरणामध्ये पाण्याचा साठाच होणे अवघड बनले आहे.

कोदवली धरणातील नैसर्गिक जलस्त्रोताचे पाणी राजापूर शहरवासीयांना जेमतेम आठ-नऊ महिनेच पुरते. उर्वरित तीन-चार महिन्यांसाठी नगर परिषदेला शीळ येथील जॅकवेलवर अवलंबून रहावे लागले. या शीळ जॅकवेलवरून राजापूर शहराला बऱ्यापैकी पाणी मिळत असले तरी हे पाणी खर्चिक ठरत आहे. त्यातच वीज भार नियमनामुळे शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यात नगर परिषदेला अनंत अडचणींना सामोरे जावे लागते.

कोदवली येथील सायबाच्या धरणातून वाहणारा नैसर्गिक जलस्त्राेत गुरुत्वाकर्षण पद्धतीने फिरवून त्याद्वारे नगर परिषद शहरवासीयांना पाणीपुरवठा करत आहे. सायबाच्या धरणातून वाहणारा नैसर्गिक जलस्त्रोतही आता मोठ्या प्रमाणात कमी होत आला असून, यावर्षी राजापूरकरांवर एप्रिल महिन्यामध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सद्य:स्थितीत कोदवली धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. शिवाय पाणीपुरवठ्याच्या वेळही विस्कळीत झाला आहे. शिवाय शीळ जॅकवेलवरून पाणीपुरवठा करताना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे काही भागाला आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना नगर परिषदेने दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. टंचाई काळात शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी केले आहे.

Web Title: One day water from tomorrow in Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.