शाळेत गुरुजींची शंभर टक्के हजेरी, अध्यापनावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:22 AM2021-06-17T04:22:04+5:302021-06-17T04:22:04+5:30

रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन पध्दतीवर विशेष भर देण्यात आला होता. जिल्ह्यात ...

One hundred percent attendance of Guruji in school, emphasis on teaching | शाळेत गुरुजींची शंभर टक्के हजेरी, अध्यापनावर भर

शाळेत गुरुजींची शंभर टक्के हजेरी, अध्यापनावर भर

googlenewsNext

रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन पध्दतीवर विशेष भर देण्यात आला होता. जिल्ह्यात ४२ टक्के ऑनलाईन अध्यापन सुरू होते. मोबाईल नेटवर्कअभावी ५८ टक्के अध्यापन ऑफलाईन पध्दतीने करण्यात आले. सुरुवातीचे दोन महिने वगळता अन्य महिन्यात शिक्षकांची उपस्थिती शंभर टक्के राहिली.

गतवर्षी (मार्च २०२०) मध्ये लाॅकडाऊन झाले. अनेक शिक्षकांना कोरोना ड्युटी लावण्यात आली होती. काही शिक्षक परजिल्ह्यातील असल्याने गावी गेले होते. ‘ई’ पास अभावी परतणे अशक्य झाले होते. जुलैपासून ऑनलाईन अध्यापन सुरू झाले. त्यामुळे जून आणि जुलै वगळता अन्य महिन्यात रजा, आजारी ही कारणे वगळता अध्यापनासाठी शिक्षकांची उपस्थिती शंभर टक्के राहिली आहे.

मोबाईल नेटवर्क नसणाऱ्या गावातील मुलांचा प्रश्न उद्भवला होता. मात्र ग्रामस्थ व पालक यांच्या सहकार्यामुळे त्यावर मार्ग काढणे सोपे झाले. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करीत शिक्षकांनी अध्यापन केले.

- एस.जे मुरकुटे, उपशिक्षणाधिकारी, रत्नागिरी.

रत्नागिरी जिल्हा भाैगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसला आहे. वाडीवस्तीवर मोबाईल नेटवर्क नसल्याने ऑनलाईन अध्यापनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ग्रामस्थ, पालक यांच्या सहकार्यामुळे मंदिरे, पालकांच्या घरी अध्यापनासाठी शिक्षकांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे ४२ टक्के ऑनलाईन तर ५८ टक्के शिक्षण ऑफलाईन पध्दतीने शक्य झाले. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही.

-निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी.

सुरूवातीचे काही दिवस वगळता शिक्षकांनी मुले शैक्षणिक प्रवाहापासून वंचित राहू नये यासाठी मेहनत घेतली ऑनलाईन शक्य नसणाऱ्या गावात मुलांना प्रत्यक्ष अध्यापन करण्यात येत होते.

- दीपक नागवेकर, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरी

गतवर्षी ऑनलाईन अध्यापन पध्दती शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी नवी होती. मात्र नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना अध्यापन करण्यात आले. मात्र ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षकांनी प्रत्यक्ष जावून अध्यापन केले.

- हुसेन पठाण, मुख्याध्यापक.

मंडणगड ४०९/१८५

खेड ११०६/७१४

दापोली ८४१/५५७

चिपळूण १२७४/९१०

गुहागर ५९१/२९३

संगमेश्वर १०४७/५२५

रत्नागिरी १२४२/९५७

लांजा ६२८/२३०

राजापूर ९०४/४३१

Web Title: One hundred percent attendance of Guruji in school, emphasis on teaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.