ऑनलाईन वीजबिल भरणातून एक लाखाचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:22 AM2021-06-22T04:22:06+5:302021-06-22T04:22:06+5:30

रत्नागिरी : कोरोनामुळे ग्राहक घराबाहेर पडणे टाळत असल्याने ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. जिल्ह्यातील एक लाख अकरा ...

One lakh revenue from online electricity bill payment | ऑनलाईन वीजबिल भरणातून एक लाखाचा महसूल

ऑनलाईन वीजबिल भरणातून एक लाखाचा महसूल

Next

रत्नागिरी : कोरोनामुळे ग्राहक घराबाहेर पडणे टाळत असल्याने ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. जिल्ह्यातील एक लाख अकरा हजार ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरून ११ कोटी २३ लाख ५० हजार ७७५ रूपयांचा महसूल जमा केला आहे. त्या तुलनेत ऑफलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी आहे. जिल्ह्यातील ८२ हजार १०४ ग्राहकांनी प्रत्यक्ष वीजबिल केंद्रावर जावून वीजबिल भरले आहे. त्यामुळे आठ कोटी ८७ लाख ४५ हजार १०४ रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण व खेड विभागांमध्ये ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल अधिक आहे. जिल्ह्यातून एकूण एक लाख ९३ हजार १०४ ग्राहकांकडून २० कोटी १० लाख ९५ हजार ८७९ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रावरील गर्दी कमी झाली आहे.

चिपळूण विभागातील २१ हजार ५१६ ग्राहकांनी प्रत्यक्ष वीजबिल भरल्याने २ कोटी १९ लाख ९१ हजार ५८५ रुपये तर २३ हजार ६४१ ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरल्यामुळे २ कोटी ४४ लाख ३९ हजार ६३५ रूपये जमा झाले आहेत. एकूण ४५ हजार १५७ ग्राहकांकडून चार कोटी ६४ लाख ३१ हजार २२० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

खेड विभागातील २१ हजार ७२५ ग्राहकांनी प्रत्यक्ष वीजबिल भरल्यामुळे दोन कोटी ४९ लाख ७३ हजार ७५१ रूपये, ३० हजार १२५ ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरल्यामुळे तीन कोटी ११ हजार १६४ रूपये प्राप्त झाले. एकूण ५१ हजार ८५० ग्राहकांकडून ५ कोटी ४९ लाख ८४ हजार ७३५ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

रत्नागिरी विभागातील ३८ हजार ८६३ ग्राहकांनी ऑफलाईन वीजबिल भरल्यामुळे चार कोटी १७ लाख ४५ हजार १०४ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तर ५७ हजार २३४ ग्राहकांनी मात्र ऑनलाईन वीजबिल भरल्यामुळे पाच कोटी ७८ लाख ९ हजार ९७७ तर एकूण ९६ हजार ९७ ग्राहकांकडून नऊ कोटी ९६ लाख ७९ हजार ९२५ रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.

---------------------------

कोरोनामुळे असलेली कडक संचारबंदी, लाॅकडाऊन यामुळे ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. जिल्ह्यातील तीनही विभागांमध्ये ऑनलाईन वीजबिल भरणारे ग्राहक अधिक आहेत. ग्राहकांनी प्रत्यक्ष वीजबिल भरण्यासाठी केंद्राकडे न जाता, ऑनलाईन सुविधेचा वापर करावा.

- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडळ

Web Title: One lakh revenue from online electricity bill payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.