एका महिन्यात खानू येथे ८५० जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:50+5:302021-04-19T04:28:50+5:30
पाली : शासनाने काेराेना प्रतिबंधित लस ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयावरील नागरिकांना देण्याचे आदेश दिले आहेत. ...
पाली : शासनाने काेराेना प्रतिबंधित लस ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षे वयावरील नागरिकांना देण्याचे आदेश दिले आहेत. पालीजवळील खानू येथील प्राथमिक आराेग्य केंद्र खानूच्या मार्फत आजपर्यंत एक महिन्याच्या कालावधीत पाली विभागातील ८५० जणांना लस देण्यात आली. मात्र, येथील नागरिकांची संख्या पाहता सदरच्या लसीचा पुरवठा प्रशासनाकडून कमी प्रमाणात हाेत आहे. ताे रुग्णालयाला वाढवून द्यावा, अशी मागणी हाेत आहे.
एक महिन्याच्या कालावधीत प्राथमिक आराेग्य केंद्र खानूला ८५० लस शासनाकडून देण्यात आली. ही लस दाेन टप्प्यांत देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ६०० डाेस देण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यात अवघे २५० डाेस उपलब्ध झाले. पहिल्या टप्प्यात ६०० डाेस पैकी ५७० डाेस केंद्रामार्फत ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक आणि शासकीय कर्मचारी यांना देण्यात आले. खानू आराेग्य केंद्राअंतर्गत जे कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांनी हातखंबा आराेग्य केंद्रात यापूर्वी डाेस घेतले असल्याने हातखंबा केंद्राला ३० डाेस देण्यात आले.
त्यानंतर १५ एप्रिलला जे २५० डाेस आले, ते सर्वच्या सर्व येथील ज्येष्ठ नागरिक व ४५ वयावरील नागरिकांना देण्यात आले. ते डाेस अवघ्या तीन दिवसांतच संपले.
...........................
चार उपकेंद्रांतून लस देण्याचा विचार
ही लस प्राथमिक आराेग्य केंद्र खानूव्यतिरिक्त चरवेली येथील उपकेंद्रात तेथील स्थानिक आणि बाजूच्या वेळवंड या गावातील नागरिकांना देण्यात आली. खानू केंद्राअंतर्गत चरवेली, कापडगाव, पाली आणि नाणरज अशी चार उपकेंद्रे आहेत. या गावातील नागरिकांना खानू येथे येण्यासाठी अडचण येत असल्याने भविष्यात या चार उपकेंद्रांत लस देण्याचा येथील केंद्राचा मानस आहे. मात्र, अजून तसा निर्णय झालेला नाही.