कशेडीतील एक बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण होणार - मंत्री रवींद्र चव्हाण

By मनोज मुळ्ये | Published: July 14, 2023 04:13 PM2023-07-14T16:13:01+5:302023-07-14T16:17:36+5:30

प्लास्टिक आच्छादन वापरुन काँक्रिटीकरण सुरू 

One tunnel in Kashedi will be completed by Ganeshotsav says Minister Ravindra Chavan | कशेडीतील एक बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण होणार - मंत्री रवींद्र चव्हाण

कशेडीतील एक बोगदा गणेशोत्सवापर्यंत पूर्ण होणार - मंत्री रवींद्र चव्हाण

googlenewsNext

रत्नागिरी : चाकरमानी गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी एक मार्गिका पूर्ण करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. त्यानुसार कामाला गती आली आहे. कशेडी बोगदाही पूर्णत्वाकडे जात आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

मंत्री चव्हाण यांनी पनवेपासून महामार्ग चौपदरीकरण कामाची पाहणी सुरू केली आहे. कशेडी बोगद्यातील काम पाहिल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पावसाळ्यात काँक्रिटीकरण करण्याबाबत शंका होती. मात्र २०० मीटर अंतरावर प्लास्टिकचे आच्छादन वापरुन काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे काम चांगल्या दर्जाचे व गतीने होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: One tunnel in Kashedi will be completed by Ganeshotsav says Minister Ravindra Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.