कशेडी घाटातील भुयारातून पावसाळ्यापूर्वी एकेरी वाहतूक सुरू होणार, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती
By अरुण आडिवरेकर | Published: May 10, 2023 12:17 PM2023-05-10T12:17:51+5:302023-05-10T12:18:07+5:30
मुंबई - गोवा महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणीचाही आढावा घेतला
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भुयारी मार्गातून एकेरी वाहतूक येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. राज्यातील ग्रामीण रस्ते, राष्ट्रीय महामार्ग यांच्या कामाचा आढावा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात विशेष करून ३ लाख किलो मीटर रस्ते, यात राष्ट्रीय, राज्यस्तरीय व ग्रामीण रस्ते जलतगतीने होताना दिसत आहे. यात येणाऱ्या अडचणींचा आढावाही त्यांनी घेतला. ज्या अडचणीत येत होत्या त्या संबधित अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. एकाच टेबलावर सर्व असल्याने अनेक निर्णय हे अडथळ्यामुळे म्हणजे वनविभाग, महसूल या संबंधित येणाऱ्या अडथळ्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यात आला. मुंबई - गोवा महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणीचाही आढावा घेतला. या रस्त्याला दिरंगाई झाली हे रस्ते तीन टप्यात पूर्ण होणार आहेत.
पावसाळ्यापूर्वी यातील अनेक रस्ते सिंगल लेन पूर्ण होतील. परशुराम घाटात माती कोसळल्यामुळे ती माती काढून तेही पूर्ण होईल. कोस्टल रोडचाही आढावा घेतला. नॅशनल हायवेसाठी एक मुख्य कार्यालयाला हवे होते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ते मान्य झाले होते. मात्र, आता त्याची जागा बेलापूर येथे निश्चित झाली आहे. नागपूर, गोवा त्याचबरोबर इतर राज्य व ग्रामीण रस्त्यांचाही आढावा घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.