देखभाल दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:24 AM2021-05-30T04:24:49+5:302021-05-30T04:24:49+5:30

धामणीत गोळ्यांचे वाटप देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायती क्षेत्रातील एक हजार ग्रामस्थांना येथील भाजपतर्फे व्हिटॅमिन सी, डी ...

Ongoing maintenance repairs | देखभाल दुरुस्ती सुरू

देखभाल दुरुस्ती सुरू

Next

धामणीत गोळ्यांचे वाटप

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायती क्षेत्रातील एक हजार ग्रामस्थांना येथील भाजपतर्फे व्हिटॅमिन सी, डी आणि झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. भाजपचे तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे आणि परेश देवरुखकर यांच्यातर्फे हे वाटप करण्यात आले. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

इंजिनिअरची मागणी

रत्नागिरी : ऑक्सिजन कक्षात पाइपलाइनसह आदी उपकरणे साधनसामग्री आदींच्या योग्य वापरासाठी बायोमेडिकल इंजिनिअरची आवश्यकता असते. जिल्हा रुग्णालयात या दृष्टीने विचार होऊन ऑक्सिजन कक्षात बायोमेडिकल इंजिनिअर नियुक्त केल्यास भंडारा आदी ठिकाणी झालेले अपघात टाळता येतील, असे मत व्यक्त होत आहे.

चिखलाचे साम्राज्य

पाली : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाली बाजारपेठेतील रस्त्यावर सध्या चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लोकवस्तीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. खडीकरण केलेला जोडरस्ताही आता खड्डेमय झाला असून काँक्रिटीकरणाची मागणी होत आहे.

बियाणे विक्रीला प्रतिसाद

चिपळूण : चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने खरीप हंगामाकरिता भात बी-बियाणे मागविली होती. या बियाण्याच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी अजूनही बी-बियाण्यांची खरेदी केली नसेल तर त्यांनी ती वेळेत करावी, असे आवाहन खरेदी-विक्री संघाने केले आहे.

उकाड्यात वाढ

रत्नागिरी : थोड्याच दिवसात मान्सून केरळ राज्यात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे साधारणत: ८ ते १० दिवसांत हा मान्सून कोकणात दाखल होऊ शकेल. सध्या वातावरणात तसे बदल दिसू लागले आहेत. उकाड्यात दिवसेंदिवस कमालीची वाढ होऊ लागली आहे.

अंधाराचे साम्राज्य कायम

लांजा : तालुक्यातील शिपोशी पंचक्रोशीत चक्रीवादळाने विद्युत खांब, विद्युत वाहिन्या यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गेले दहा दिवस पंचक्रोशी अंधारात आहे. भांबेड येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन यासंबंधी माहितीही दिली होती. मात्र, अजूनही हा भाग अंधारात आहे.

सॅनिटायझर वाटप

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील श्री केदारलिंग ग्रामविकास मंडळातर्फे ग्रामस्थांना सॅनिटायझरच्या ५०० बाटल्या आणि २००० मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना या साहित्याचे वाटप घरपोच करण्यात आले. या उपक्रमाबद्दल मंडळाला धन्यवाद देण्यात आले.

बेरोजगारांना घरघंटी वाटप

देवरुख : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांच्या वतीने बेरोजगारांना घरघंटीचे वाटप करण्यात आले. स्वावलंबन आयामांतर्गत हा उपक्रम समितीने राबविला. सायले, काटवली या गावांमधील बेरोजगारांना घरघंटीचे वाटप करून या लोकांच्या हाताला काम मिळवून देण्यात आले आहे.

बुद्ध पौर्णिमा साधेपणाने

दापोली : तालुक्यातील विविध भागांत दरवर्षी उत्साहाने साजरी होणारी बुद्ध पौर्णिमा यावेळी कोरोनाच्या सावटामुळे अतिशय साधेपणाने साजरी करण्यात आली. यावर्षी बुद्ध विहारात न जाता बौद्ध बांधवांनी घरोघरी बुद्धांना अभिवादन केले. यावेळी सर्व पूजापाठ हे घरीच आयोजित केले होते.

Web Title: Ongoing maintenance repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.