कांद्याचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:33 AM2021-03-27T04:33:08+5:302021-03-27T04:33:08+5:30

आरोग्य तपासणी चिपळूण : शासनाच्या आदेशानुसार परजिल्ह्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू झाली आहे. विविध प्रभागांत नागरी ...

Onion prices fell | कांद्याचे दर घसरले

कांद्याचे दर घसरले

Next

आरोग्य तपासणी

चिपळूण : शासनाच्या आदेशानुसार परजिल्ह्यातून शहरात येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू झाली आहे. विविध प्रभागांत नागरी कृती दलाच्या माध्यमातून शिमगोत्सव व अन्य कारणासाठी काही काळ वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांचा शोध सुरू झाला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

तरुणांमध्ये नाराजी

रत्नागिरी : २०१९ मध्ये साडेतीन हजार जागांसाठी पोलीस भरती जाहीर झाली होती. मात्र, कोरोनामुळे ही प्रक्रिया अद्याप रखडली आहे. काही महिन्यांपूर्वी जंबो भरतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आरक्षण व इतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे ती पुन्हा रखडल्याने युवकांमध्ये नाराजी पसरली आहे. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी मात्र अमाप खर्च होत आहेत.

पालखी भेट रद्द

पावस : पावस बाजारपेठेत होळी पौर्णिमेला होणाऱ्या श्री देव रवळनाथ व श्री नवलाई देवी पालखी भेट रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचे सावट अद्याप कायम आहे, शिवाय रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे शासकीय नियमावलीचे पालन करून शिमगोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

नूतनीकरणाचे काम संथ

लांजा : तालुक्यातील दाभोळे, शिपोशी, कोर्ले, वाटूळ रस्त्याचे नूतनीकरण, विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे. गेल्या महिन्यापासून काम सुरू झाले असले, तरी अतिशय संथगतीने होत असल्याने वाहन चालकातून नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावरील मोऱ्या दुरुस्तीच्या कामावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

पुलासाठी मान्यता

खेड : तालुक्यातील किंजळेतर्फे नातू गावासाठी पूल मंजूर झाला आहे. किंजळेतर्फे नातू हे प्रकल्पग्रस्त गाव असून, या पुलाचे काम लवकर होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात कॉजवेवरून वाहतूक सुरू असते, परंतु अतिवृष्टीने वाहतूक बंद झाली, तर ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात. आरोग्यसेवाही उपलब्ध होत नाही.

सुपरफास्टला मुदतवाढ

खेड : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गांधीधाम, तिरुनेलवेल्ली सुपरफास्ट साप्ताहिक फेस्टिव्हल स्पेशल गाडीला दिनांक २८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, ही फेस्टिव्हल स्पेशल दिनांक ३ मे ते २८ जून अखेर दर सोमवारी धावणार आहे. परतीच्या प्रवासात ६ मे ते ३१ जुलै या कालावधीत दर गुरुवारी धावणार आहे.

मोफत वेबिनार

रत्नागिरी : दहावी व बारावीच्या परीक्षा तोंडावर असून, परीक्षेबाबत मुलांशी संवाद साधण्यासाठी सुयोग पेणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वेबिनार आयोजित केले आहे. दिनांक २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता वेबिनार होणार असून, गीता ज्ञानी मार्गदर्शन करणार आहेत. ‘जास्तीतजास्त गुण मिळवा, परीक्षेत क्षुल्लक चुका टाळा’ या विषयावर डॉ.यशपाल कदम यांनी यापूर्वी मार्गदर्शन केले होते.

रक्तदान शिबिर

आरवली : धामापूरतर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व संवेदना संघटना यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र माखजन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. उद्घाटन अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Onion prices fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.