ऑनलाइन नृत्य प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:30 AM2021-05-17T04:30:03+5:302021-05-17T04:30:03+5:30
परिचारिकांना मास्क वाटप चिपळूण : येथील बालशिवाजी मित्रमंडळ वैश्य वसाहतीतर्फे परिचारिकांना ५०० मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ...
परिचारिकांना मास्क वाटप
चिपळूण : येथील बालशिवाजी मित्रमंडळ वैश्य वसाहतीतर्फे परिचारिकांना ५०० मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र देवळेकर, युवासेना शहरप्रमुख निहार कोवळे, उपाध्यक्ष वरुण गुढेकर, विनीत गुढेकर, मयूर कोळवणकर, अवधूत कोळवणकर, महेश गुरव आदी उपस्थित होते.
अनुदानासाठी मुदतवाढ
राजापूर : कोरोनासंबंधात कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये सानुग्रह साहाय्य लागू करण्यासाठी दि. ३० जूनपर्यंत मुदतवाढीचा महत्त्वूपर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वीज जोडणीची प्रतीक्षा
रत्नागिरी : जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढावे, शेतीला प्राधान्य द्यावे यासाठी शासनाकडून जनतेचे प्रबोधन केेले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विंधन विहिरीसाठी प्राधान्य दिले आहे. ४११ शेतकऱ्यांनी पैसे भरूनही अद्याप विहिरींना वीज जोडणी देण्यात आलेली नाही.