शाळा, महाविद्यालयांचे आॅनलाईन मूल्यांकन

By admin | Published: September 14, 2014 09:58 PM2014-09-14T21:58:25+5:302014-09-15T00:13:39+5:30

शिक्षण क्षेत्रात समाधान : शाळा, महाविद्यालयांसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत

Online evaluation of schools, colleges | शाळा, महाविद्यालयांचे आॅनलाईन मूल्यांकन

शाळा, महाविद्यालयांचे आॅनलाईन मूल्यांकन

Next

टेंभ्ये : राज्यात कायम विनाअनुदानित स्वरुपात परवानगी दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे मुल्यांकन आॅनलाईन पद्धतीने करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सन २०१३-१४ च्या अभिलेखांवर आधारित हे मुल्यांकन करण्यात येणार आहे. आॅनलाईन पद्धतीने माहिती संकलीत करण्यासाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया शासनाने सन २०१३-१४ पासून सुरु केल्याने शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.राज्य शासनाने कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांच्या मान्यता आदेशातील ‘कायम’ हा शब्द नुकताच काढून टाकला आहे. त्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया शासनाने सुरु केली आहे. ६६६.ेंँङ्मिी२ीूङ्मल्लंि१८.ूङ्मे या संकेतस्थळावर आवश्यक माहिती अपलोड करावी लागणार आहे. २०१३-१४ च्या अभिलेखावर आधारित माहिती भरावी लागणार असल्याने यासंदर्भातील पुरावे म्हणून जवळपास वेगवेगळे १२ फोटो अपलोड करावे लागणार आहेत. मुल्यांकनाबाबतचा सविस्तर कार्यक्रम शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिककडून जाहीर करण्यात आला आहे.
संबंधित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना २५ सप्टेंबरपर्यंत भरलेल्या माहितीच्या चार हार्डकॉपी शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर कराव्या लागणार आहेत. त्यानंतर प्राप्त झालेले प्रस्ताव लोकांच्या हरकती मागवण्यासाठी मुल्यांकनाच्या संकेतस्थळावर ५ आॅक्टोबरपर्यंत टाकणे अपेक्षित आहे. हरकती नोंदवण्यासाठी ६ ते २० आॅक्टोबर हा कालावधी देण्यात आला आहे. तद्नंतर आलेल्या हरकतींचा विचार करुन विहीत निकषानुसार मुल्यांकन करुन ३० आॅक्टोबरपर्यंत गुणदान करावे लागणार आहे. त्यानंतर पात्र व अपात्र शाळांची स्वतंत्र यादी वस्तूनिष्ठ कारणासह विहीत नमुन्यात शिक्षण उपसंचालक यांच्याकडे हार्डकॉपी व सॉफ्ट कॉपीमध्ये दि. १ नोव्हेंबरपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. १० नोव्हेंबरपर्यंत शिक्षण उपसंचालकांकडून प्राप्त अर्जांपैकी २० टक्के अर्ज तपासले जाणार आहेत. शेवटी १२ नोव्हेंबरपर्यंत विभागातील अनुदानासाठी पात्र शाळांची यादी शासनाकडे सादर केली जाणार आहे.(वार्ताहर)
अंमलबजावणी सक्तीची
आॅनलाईन मुल्यांकन प्रक्रियेसाठी देण्यात आलेले वेळापत्रक महत्त्वपूर्ण आहे. सर्व स्तरावरुन या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करणे सक्तीचे असल्याचे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी स्पष्ट केले.

Web Title: Online evaluation of schools, colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.