ऑनलाईन व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:30 AM2021-03-21T04:30:02+5:302021-03-21T04:30:02+5:30

कार्यकारिणीची निवड दापोली : दापोली तालुका नाभिक समाज कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. अध्यक्षपदी मंगेश शिंदे, सचिव शैलेश चव्हाण, ...

Online lectures | ऑनलाईन व्याख्यान

ऑनलाईन व्याख्यान

Next

कार्यकारिणीची निवड

दापोली : दापोली तालुका नाभिक समाज कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. अध्यक्षपदी मंगेश शिंदे, सचिव शैलेश चव्हाण, खजिनदारपदी प्रीतम शिंदे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी तालुक्यातील एकूण सात गटांचे अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली.

मोफत आरोग्य तपासणी

राजापूर : तालुक्यातील नाटे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, वसंत पाटील, बाळ दाते उपस्थित होते. डॉ. ओंकार वाडकर तर प्रियांका कुडाळकर, डॉ. विशाल राणे यांनी रुग्णांची तपासणी केली.

यात्रा रद्द

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे शिमगोत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो. कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करून साध्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शिंदे, आंबेरी तसेच कडवई परिसर येथे पालखी भेटीदरम्यान होणा-या सर्व यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

खेड : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या येथील शाखेतर्फे प्राथमिक शिक्षकांकरिता जिल्हास्तरावर मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. रविवार दिनांक २१ मार्चपर्यंत या स्पर्धा खेळविल्या जाणार असून, बक्षीस वितरण सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

सिग्नल यंत्रणा बंदची मागणी

रत्नागिरी : शहरामध्ये पाण्याच्या वाहिनीचे काम सर्वत्र सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. परिणामी शहरातील सिग्नल यंत्रणा काही महिने बंद ठेवावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहे.

ग्राम कृतीदल सक्रिय

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रशासनाने शासकीय निर्बंध जारी केले आहेत. जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन ग्राम व नागरी कृती दलाने करायचे आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्रामकृतीदल सक्रिय झाले आहे. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी ग्रामस्थ एकत्र येऊन ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ अभियान गावागावात सुरू होणार आहे.

पालखी फिरणार नाही

राजापूर : तालुक्यातील कोदवली येथील महाकाली मंदिर येथे ग्रामस्थांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शिमगोत्सव शांततेत साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात पालखी न फिरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी नाना रायकर, अवी रायकर व मानकरी उपस्थित होते.

शिष्यवृत्ती परीक्षेत बदल

रत्नागिरी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिष्यवृत्ती योजनेची परीक्षा २१ मार्च रोजी घेण्यात येणार होती. मात्र ती आता ६ एप्रिल रोजी होणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी सूचित केले आहे. राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रावरील ७६१ उपकेंंद्रावर ही परीक्षा होणार आहे.

खड्डे भरण्याची मागणी

मंडणगड : केळवत घाट ते दुधारे गाव या मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. तातडीने खड्डे भरण्याची मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आले आहे. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

इंटरनेटचा खेळखंडोबा

आरवली : येथून जवळच असलेल्या माखजन परिसरात मोबाईल सेवा वारंवार खंंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने याचा फटका शैक्षणिक व बँकिंग क्षेत्राला बसत आहे. माखजन परिसरात भारत संचार निगमसह खासगी कंपन्यांचीही मोबाईल सेवा असून वारंवार बिघाड होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे.

निर्वाह भत्ता योजना

रत्नागिरी : भारत सरकार युवा व क्रीडा मंत्रालय यांच्या ७ जून २०१८ रोजीच्या परिपत्रक निर्णयानुसार गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे, सक्रिय क्रीडा करिअरमधून अतिरिक्त आर्थिक सेवा निवृत्ती प्रदान करणे या महत्त्वाच्या योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

आठवडा बाजारात जागृती

राजापूर : तालुक्यामधून आठवडा बाजारात फिरून भारतीय जनता पक्षातर्फे कोरोनामुळे घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात आली. शिवाय ग्राहकांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. ‘मास्क लावा व कोरोना टाळा’ असा संदेश जनजागृतीच्या माध्यमातून देण्यात आला.

Web Title: Online lectures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.