खेडमध्ये आठवडाभरात केवळ १६ कोरोना रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:39 AM2021-09-09T04:39:11+5:302021-09-09T04:39:11+5:30
खेड : तालुक्यात आठवडाभरात केवळ १६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. रुग्ण कमी झाले असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे ...
खेड : तालुक्यात आठवडाभरात केवळ १६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. रुग्ण कमी झाले असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यातील ७ दिवसांत केवळ १६ रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात घटलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे प्रशासनाने काही शासकीय कोविड सेंटर बंद केली आहेत. सद्य:स्थितीत नगरपरिषद कोविड सेंटरमध्ये ७, तर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये ६ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. याव्यतिरिक्त गृहविलगीकरणात २१ रुग्ण आहेत.
तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६,२७७ इतकी झाली असून, ६,००९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३८ रुग्ण सक्रिय आहेत. दिवसभरात ७ रुग्ण बरे झाले, तर ३ नवे रूग्ण आढळले. तालुक्यात सद्य:स्थितीत ३ कन्टेनमेंट झोन कार्यान्वित आहेत. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या २३० वर पोहोचली आहे.