गणेश विसर्जनासाठी केवळ ५ जणांनाच प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:33 AM2021-09-19T04:33:27+5:302021-09-19T04:33:27+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात रविवारी अनंत चतुर्दशीला ३३,७१८ आणि सार्वजनिक ४७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात ...
रत्नागिरी : जिल्ह्यात रविवारी अनंत चतुर्दशीला ३३,७१८ आणि सार्वजनिक ४७ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. विसर्जन स्थळी केवळ ५ जणांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
गतवर्षीपासून काेराेनाचे सावट गणेशाेत्सवावर राहिले आहे. यावर्षी काेराेनाची रुग्णसंख्या कमी असल्याने काहीसे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, काेराेनाचा धाेका संपलेला नसल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. विसर्जनस्थळी हाेणारी गर्दी टाळण्यासाठी केवळ पाचच जणांना प्रवेश दिला जाणार आहे. अन्य काेणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याने पाेलिसांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात विसर्जनादरम्यान पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात येणार असून, त्याचे नियाेजन करण्यात आले आहे. बंदाेबस्तासाठी अधिकारी ५६, अंमलदार ४११, राज्य राखीव दलाच्या दाेन तुकड्या, दंगल विराेधी पथक १, शीघ्र कृती दल १, प्रविष्ठ पोलीस उपनिरीक्षक २०, नवप्रविष्ठ अंमलदार १००, होमगार्ड २४१ तैनात ठेवण्यात येणार आहेत.