सेतूमध्ये केवळ अत्यावश्यक दाखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:41 AM2021-06-16T04:41:09+5:302021-06-16T04:41:09+5:30

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू काही दिवसांपासून बंद असून, केवळ अत्यावश्यक दाखल्यांसाठी तहसील कार्यालयाकडून सहकार्य ...

Only essential proofs in the bridge | सेतूमध्ये केवळ अत्यावश्यक दाखले

सेतूमध्ये केवळ अत्यावश्यक दाखले

googlenewsNext

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू काही दिवसांपासून बंद असून, केवळ अत्यावश्यक दाखल्यांसाठी तहसील कार्यालयाकडून सहकार्य केले जाईल, अशी माहिती रत्नागिरी तहसील कार्यालयामार्फत देण्यात आली. अत्यावश्यक बाब म्हणून वैद्यकीय कामासाठी दाखले देण्याचे काम सुरू झाले आहे.

निकृष्ट आहार

खेड : कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांना सकस आहार मिळत नसल्याचे उघड झाले आहे. याप्रश्नी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत जिल्हा शल्यचिकित्सकांना खडे बोल सुनावले. यात तातडीने बदल करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली आहे.

बालवैज्ञानिक म्हणून निवड

खेड : भडगाव येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिरमधील इयत्ता ६वीतील प्रथमेश भिडे याने मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशनमार्फत घेण्यात आलेल्या डाॅ. होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत रौप्यपदक पटकावले. त्याची बालवैज्ञानिक म्हणून निवड झाली आहे.

वरवलीत वृक्षारोपण

खेड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील लायन्स क्लब ऑफ खेड स्टारच्या वतीने तुळस, बदाम, वड, पिंपळ, गुलमोहोर आदी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी उपाध्यक्षा संपदा गुजराथी, अश्विनी वडके उपस्थित होत्या.

मनसेतर्फे वृक्षारोपण

गुहागर: तालुका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गिमवी ते मोडकाघरदरम्यान वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ भाजपचे माजी आमदार व उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डाॅ. विनय नातू यांच्याहस्ते करण्यात आला. यानंतर मनसे कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.

साहित्य वाटप

चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून चिपळूण मेडिकल कामगार संघटनेच्यावतीने अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

लसीकरण मोहीम

रत्नागिरी : ग्रामपंचायत उक्षी येथे जिल्हा परिषद आरोग्य सभापती उदय बने यांच्या पुढाकाराने व सरपंच किरण जाधव यांच्या सहकार्याने कोविशिल्डचे ७२ डोसचे लसीकरण झाले. यावेळी उपसरपंच नागवेकर, अन्वर गोलंदाज, रोहिणी पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Only essential proofs in the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.