Monsoon सुरू, पावसाची जिल्ह्यात जोरदार सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 04:10 PM2021-06-08T16:10:44+5:302021-06-08T16:13:26+5:30

Monsoon Rain Ratnagiri : मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली असून मंगळवारपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. सोमवार रात्रीपासूनच पावसाची फटकेबाजी सुरू आहे.

With the onset of monsoon rains, the rains have opened strongly in the district | Monsoon सुरू, पावसाची जिल्ह्यात जोरदार सलामी

Monsoon सुरू, पावसाची जिल्ह्यात जोरदार सलामी

googlenewsNext
ठळक मुद्देमान्सूनच्या पावसाला सुरूवातपावसाची जिल्ह्यात जोरदार सलामी

रत्नागिरी : मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली असून मंगळवारपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. सोमवार रात्रीपासूनच पावसाची फटकेबाजी सुरू आहे.

जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने दोन दिवस आधीच आगमन केले आहे. दर वर्षी साधारणत: ७ जूनपासून पावसाला प्रारंभ होतो. मात्र, गेल्या पाच - सहा वर्षांपासून पावसाच्या आगमनात अनियमितता आली आहे. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

गेल्यावर्षी ३ जून रोजी रोजी झालेल्या निसर्ग, चक्री वादळाच्या प्रभावाने जिल्ह्यात चार दिवस पाउस पडत होता, त्यानंतर तो नियमित झाला होता. यावर्षीही १६ मे रोजी तौक्ते वादळाच्या प्रभावाने जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यातच अधुनमधून पाऊस सुरू होताच. यावर्षी ३१ मे ला मान्सून केरळात आल्यानंतर दहा दिवसांत तो कोकणात येइल, असा अंदाज असतानाच ६ जूनलाच मान्सून कोकणात दाखल झाला आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर घेतला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुसळधार पाउस पडत होता. त्यानंतर काही वेळ उघडीप होती. या कालावधीत सूर्यदर्शनही झाले. त्यानंतर दुपारी पुन्हा पावसाने संततधारेने बरसण्यास सुरूवात केली आहे.

कोकणात १० जूनपासून पुढे पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाची सुरूवातीपासूनच जोरदार सलामी सुरू झाली असल्याचे दिसू लागले आहे.
 

Web Title: With the onset of monsoon rains, the rains have opened strongly in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.