पाणीटंचाईला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:26+5:302021-04-13T04:29:26+5:30
खेड : तालुक्यातील खोपी गावाला सध्या पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाणीटंचाईने उग्र ...
खेड : तालुक्यातील खोपी गावाला सध्या पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. खोपी रामजीवाडी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने टँकर मागणीचा अर्ज येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे सादर केला आहे.
गावात जनजागृती
चिपळूण : दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती भयावह होऊ लागली आहे. या अनुषंगाने प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. चिपळूण शहरालगतच्या धामणवणे ग्रामपंचायतीने गावात कोरोनाबाबत जनजागृती करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला.
लॉकडाऊनची भीती
दापोली : गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाला होता; मात्र डिसेंबरनंतर प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत होतील, असे वाटत होते; मात्र यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा झालेल्या लॉकडाऊनमुळे पर्यटन थांबले आहे. यापुढेही कडक लॉकडाऊनची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
परवान्यासाठी सेतू
रत्नागिरी : अन्न व औषध प्रशासनाच्या येथील कार्यालयात सेतू सुविधा केंद्र सुुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांना परवान्यासाठी इतरत्र न जाता या विभागातच परवाने दिले जाणार आहेत. माफक शुल्क आकारुन अत्यावश्यक परवाने दिले जाणार आहेत.
चाचण्यांसाठी गर्दी
रत्नागिरी : प्रशासनाने दुकाने किंवा आस्थापने सुरू ठेवण्यासाठी यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीने लसीकरण करून घेण्याचे आदेश दिले आहेत, तसेच कोरोना चाचण्या करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता दुकानचालक तसेच आस्थापनातील कर्मचारी यांची कोरोना चाचणीसाठी गर्दी होऊ लागली आहे.