दार उघड उद्धवा, दार उघड, भाजपतर्फे रत्नागिरीत घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 01:31 PM2020-08-29T13:31:54+5:302020-08-29T13:33:35+5:30
दार उघड उद्धवा दार उघड, अशी घोषणा देत भाजपतर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
रत्नागिरी : दार उघड उद्धवा दार उघड, अशी घोषणा देत भाजपतर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कोरोना महामारी व त्यामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली. परंतु आता अनलॉक सुरू झाले असून, सर्व मंदिरे सुरू झाली पाहिजेत, अशी मागणी करत ह्यदार उघड उद्धवाह्ण घंटानाद आंदोलन भाजपतर्फे करण्यात आले.
महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना, धर्माचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन ठाकरे सरकारला घंटानाद करून इशारा देणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, धामणसे, कºहाडेश्वर मंदिर, पावस, गणपतीपुळे, पाली, निवळी, हातखंबा, मारूती मंदिर आदीसह अनेक मंदिरांमध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले.
रत्नागिरीतील मारूती मंदिर सर्कल येथे करण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनावेळी जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विकास सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, महेश सुर्वे, माजी उपनगराध्यक्ष भैय्या मलुष्टे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, अॅड. ऋषिकेश शितूत, विजय साखळकर, मोहन पटवर्धन, नितीन गांगण, अशोकत वाडेकर, प्राजक्ता रूमडे, प्रवीण रूमडे उपस्थित होते.
केंद्र सरकारनेही ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले. त्यानुसार देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू झाली. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तींसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची भजन, कीर्तन व पूजन करण्याची मागणी भाजपने केली आहे.