झोडपण्याच्या इशाऱ्यानंतरही शिवसैनिकांकडून नाणारचे खुले समर्थन; सभेला केली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:50 PM2020-03-02T17:50:22+5:302020-03-02T17:50:49+5:30

नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली होती.

Open support for Nanar Refinery after Shiv Sena MP warning to party workers in Rajapur hrb | झोडपण्याच्या इशाऱ्यानंतरही शिवसैनिकांकडून नाणारचे खुले समर्थन; सभेला केली गर्दी

झोडपण्याच्या इशाऱ्यानंतरही शिवसैनिकांकडून नाणारचे खुले समर्थन; सभेला केली गर्दी

Next

राजापूर : शिवसेनेने घेतलेल्या ठाम विरोधी भूमिकेनंतरही रिफायनरी समर्थनासाठी डोंगर तिठा (ता. राजापूर) येथे आयोजित मेळाव्याला मोठी गर्दी झाली आहे. असंख्य स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व विविध संघटनांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे. 


नाणार रिफायनरीचा विषय संपलेला आहे, काही झाले तरी नाणार प्रकल्प होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या कात्रादेवी येथील सभेत मांडली होती. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य मंदा शिवलकर यांची हकालपट्टी केल्याचेही सांगितले. या सभेला मंत्री उदय सामंत, आमदार  राजन साळवी व प्रकल्प विरोधी नेते अशोक वालम उपस्थित होते. यावेळी राऊत यांनी शिवसेनेचा गमछा किंवा झेंडा घेऊन कोणी शिवसैनिक रिफायनरीला पाठिंबा देईल त्याची गय केली जाणार नाही हा त्यांनी इशारा समजावा. यापुढे जो शिवसैनिक रिफायनरीचे समर्थन करेल त्याला झोडून काढावे, असेही सांगितले होते. 

'नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकालाही झोडून काढा'

धक्कादायक...! आप नगरसेवकाच्या घरी अ‍ॅसिडने भरलेले ड्रम; त्यावर गंगाजलाचा उल्लेख

मात्र, आज दुपारी नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ बोलविण्यात आलेल्या मेळाव्याला हजारो लोक उपस्थित राहिले होते. यामध्ये अनेक जणांनी शिवसेनेची भगवी टोपी, गमछा घातला होता. यामुळे खासदारांचे आदेशच शिवसैनिक मानत नसल्याचे चित्र आज राजापूरमध्ये दिसले. 
मेळाव्यासोबत सत्यनारायणाची पूजाही आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: Open support for Nanar Refinery after Shiv Sena MP warning to party workers in Rajapur hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.