बागायतदारांना विम्याचा पर्याय

By admin | Published: November 17, 2014 10:02 PM2014-11-17T22:02:11+5:302014-11-17T23:51:46+5:30

आंबा-काजूला धोका : गतवर्षीच्या नुकसानग्रस्तांना पावणेतीन कोटींची भरपाई

The option of insurance to the growers | बागायतदारांना विम्याचा पर्याय

बागायतदारांना विम्याचा पर्याय

Next

रत्नागिरी : अवेळी पाऊस, उच्चत्तम तापमान व नीचांकी तापमान यामुळे आंबा व काजूच्या पिकावर परिणाम झाल्याने होणारे नुकसान लक्षात घेता शासनाने कृषी विभागाच्यावतीने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गतवर्षीच्या १०२४ शेतकऱ्यांना २ कोटी ७३ लाख ५५ हजार ९३२ रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.
शासनातर्फे कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात २०११-१२ पासून फळपीक विमा योजना सुरू करण्यात आली. अवेळचा पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान या निकषावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १४५७ आंबा बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता. मात्र, १०२४ शेतकऱ्यांचे वादळीवारे, कडक उन्हाळा यामुळे नुकसान झाले. विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. गतवर्षीच्या ८० टक्के शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे.
शासनातर्फे यावर्षीदेखील फळपीक विमा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबा व काजू या फळपिकांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आंबा पिकासाठी ६ हजार रुपये विमा हप्त्याची रक्कम आहे. संबंधित रक्कम नजीकच्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकेच्या शाखेत भरायची आहे. या योजनेसाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स कंपनी कार्यरत असून, आंबा पिकासाठी हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. ही योजना १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०१५ या कालावधीसाठी अवेळी पाऊस, कमी तापमान जास्त तापमान या बाबींसाठी वेगवेगळ्या कालावधीसाठी विविध निकषावर आधारित आहे. आंबा पिकासाठी १ लाख रुपये इतकी विमा संरक्षित रक्कम असून, एकूण हप्त्याची रक्कम १२ हजार रुपये आहे. त्यापैकी ५० टक्के रकमेचा वाटा शासनाचा असून, उर्वरित ५० टक्के म्हणजे ६ हजार रुपये शेतकऱ्याने भरायचे आहेत.
बागायतदारांना विम्याची रक्कम नजीकच्या बँकेमध्ये भरणा करावी लागणार आहे. राज्यातील निवडक फळांना पीक विमा योजना जाहीर करताना कोकणातील आंबा, काजू पिकाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, १०२४ शेतकऱ्यांचे वादळीवारे, कडक उन्हामुळे उत्पन्नाचे नुकसान झाले. विमा उतरवणाऱ्या बागायतदारांच्या संख्येत घट झालेली दिसून येते. गतवर्षीच्या ८० टक्के शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. यंदा हवामानातील बदलामुळे आंबा, काजूवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विमा योजनेचा बागायतदारांनी आधार घ्यावा, असे आवाहन कृषी खात्याने केले आहे. (प्रतिनिधी)

विमा काढणाऱ्यांच्या संख्येत घट

सनबाधित क्षेत्रलाभार्थी भरपाई
२०११-१२१८६६.४७१३६२३४ लाख ४१ हजार ५०० रूपये
२०१२-१३११२०१२८६२ कोटी ३२ लाख ७९ हजार ५०० रूपये
२०१३-१४१४५७ आंबा बागायतदारांनी विमा योजनेचा लाभ घेतला होता.

४बदलत्या हवामानामुळे यंदाही नुकसान होण्याची शक्यता.
४दरवर्षी विमा काढणाऱ्यांची संख्या कमी-कमी होतेय.
४गतवर्षी ८0 टक्के विमाधारकांना मिळाली नुकसानभरपाई.
४शासनाकडून भरली जाते विमा हप्त्याची ५0 टक्के रक्कम.

Web Title: The option of insurance to the growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.