बांधकाम हटविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:42+5:302021-06-21T04:21:42+5:30

इंटरनेट खांबांची चोरी गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सुरू असलेल्या कामामधील आठ लाख ५४ हजार ५० रुपये ...

Order to remove construction | बांधकाम हटविण्याचे आदेश

बांधकाम हटविण्याचे आदेश

Next

इंटरनेट खांबांची चोरी

गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी सुरू असलेल्या कामामधील आठ लाख ५४ हजार ५० रुपये किमतीच्या १५५ इंटरनेट खांबाची चोरी झाल्याची तक्रार गुहागर पोलीस स्थानकात करण्यात आली. एकूण १९० खांब आणण्यात आले होते. खांब उभारून लाइन खेचण्याचे काम सुरू आहे.

सागांच्या रोपांची लागवड

देवरूख : संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड संघटना, सामाजिक वनीकरण, वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पूर ग्रामपंचायत क्षेत्रात सागाच्या रोपांची लागवड करण्यात आली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, महिला आघाडी संघटक नेहा माने, वेदा फडके, सरपंच सुबोध पेडणेकर आदी उपस्थित होते.

उपकेंद्राची मागणी

रत्नागिरी : तालुक्यातील पावस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गणेशगुळे येथे उपकेंद्र बांधण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली होती, त्याला मंजुरी मिळाली, परंतु जागा नसल्याचे कारण देत, उपकेंद्र गोळपला हलविण्याचा घाट सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत असून, उपकेंद्र गणेशगुळेतच व्हावे, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

विलगीकरण कक्ष सुरू

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी सरस्वती विद्यामंदिर येथे कोरोना विलगीकरण कक्षाचे उद्घाटन जि.प.सदस्य आरती तोडणकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी सुरेश मोहिरे, गटविकास अधिकारी टी.बी. जाधव, गावखडी सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणार

रत्नागिरी : शहरालगत असणाऱ्या शिरगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्यालगत वड, पिंपळ, कडुनिंबाची झाडे लावून संपूर्ण परिसर सुशोभित करण्याचा निर्धार अल्ताफ संगमेश्वरी यांनी केला आहे. वटपौर्णिमेपासून प्रारंभ होणार आहे. झाडे लागवडीसाठीच नाही, तर जगविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

रस्त्यालगत वृक्षारोपण

रत्नागिरी : सामाजिक वनीकरण विभागाकडून शासनाच्या जागेत वृक्षारोपण करण्यात येते. लांजा तालुक्यातील शासनाच्या जागेमध्ये ३५ किलोमीटरच्या रस्त्यालगत विविध प्रकारांची १७,५०० झाडे लावण्यात येणार आहेत. लागवड करण्यात येणारी सर्व झाडे जंगली असणार असून, त्यासाठी ३२ लाख ६३ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.

सानिया यादवची निवड

राजापूर : वढू आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समितीतर्फे तालुक्यातील सानिया उदय यादव हिची जिल्हा युवती प्रमुख या पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. वढू आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवशाहीर आकाश भोंडले पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

कामाचा खोळंबा

रत्नागिरी : कोरोनामुळे शासकीय कार्यालयांना उपस्थितीसाठी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामे पूर्ण करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे गाड्यांचे पासिंग, टॅक्स भरणे, रिक्षा परमिट, लायसन्स काढणे, नूतनीकरण कामे रखडत आहेत.

नौकांची दुरुस्ती

रत्नागिरी : पावसाळ्यात सलग दोन महिने मासेमारी बंद असते. त्यामुळे जिल्ह्यातील २,५०० नौका किनाऱ्यावर सुरक्षित लावण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या नौका, इंजीन, जाळ्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. दोन महिन्यांत कामे प्राधान्याने पूर्ण करण्याकडे मच्छीमारांचा कल आहे.

Web Title: Order to remove construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.