रत्नागिरीतील विसर्जनस्थळी अन्य वाहनांना मनाई, ३ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश
By शोभना कांबळे | Published: September 18, 2023 07:03 PM2023-09-18T19:03:33+5:302023-09-18T19:03:49+5:30
रत्नागिरी : विसर्जनादिवशी मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी असलेल्या वाद्यांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य ...
रत्नागिरी : विसर्जनादिवशी मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी असलेल्या वाद्यांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चारचाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच भाट्ये बस स्टॉप येथून भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्तासुद्धा एकेरी असल्याने अन्य वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी विसर्जनासाठी गणपती ठेवलेल्या वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अशा सर्व प्रकारच्या वाहनांना २० सप्टेंबर रोजी (दीड दिवस), २३ सप्टेंबर रोजी (पाच दिवस) गौरी गणपती विसर्जन, २४ सप्टेंबर (सहा दिवस), २६ सप्टेंबर (आठ दिवस) आणि २८ सप्टेंबर (दहा दिवस) अनंत चतुर्दशी प्रवेश बंद करण्याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.
या दिवशी भुते नाका ते मांडवी समुद्र किनारा या दरम्यान मांडवी समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी सोबत असणाऱ्या वाद्यांच्या वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. भाट्ये बस स्टॉप येथून भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्तासुद्धा एकेरी असल्याने अन्य वाहनांना विसर्जन दिनी प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
३ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश
जिल्ह्यात १८ ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव तसेच २८ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हे सण साजरे होणार आहेत. या सणांना कुठलेही गालबोट लागू नये, ते शांततेत साजरे व्हावेत, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी यांनी १८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे