..नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील; भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना लगावला टोला

By अरुण आडिवरेकर | Published: November 26, 2024 03:40 PM2024-11-26T15:40:07+5:302024-11-26T15:44:14+5:30

रत्नागिरी : ज्यांची संख्या जास्त त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल, हे ज्यादिवशी शरद पवार यांनी जाहीर केले त्या दिवसापासून महाविकास आघाडीचा ...

otherwise there will be zero leaving only two BJP leader Pramod Jathar criticizes Uddhav Thackeray | ..नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील; भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना लगावला टोला

..नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील; भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना लगावला टोला

रत्नागिरी : ज्यांची संख्या जास्त त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल, हे ज्यादिवशी शरद पवार यांनी जाहीर केले त्या दिवसापासून महाविकास आघाडीचा रनिंग रेट खाली कोसळत गेला. हिंदुत्वाची कास सोडून उद्धव ठाकरे ज्या विचित्र दुष्टचक्रात अडकले होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जेवढ कमावल होत तेवढ उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं आहे, अगदी लुगडच गमावल आहे, असा टोला भाजपचे निवडणूक समन्वयक आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला. जनतेने भरभरुन दिलेले ६० सांभाळता आले नाहीत, त्यांच्या पदरी शेवटी २० आले. आता ते २० सांभाळून ठेवा नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील असा टोला लगावला. 

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीसाठी ते मंगळवारी रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदावरुन महायुतीत कोणताही वाद नाही. तीन पक्ष असले तरी त्यांचे न्यायाधीश दिल्लीत बसतात. महाविकास आघाडीच न्यायालय हे जजलेस होतं, महायुतीचे न्यायाधीश योग्य प्रकारे जजमेंट करतील आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री देतील, असे जठार म्हणाले.

घराबाहेर पडा, लोकांची कामे करा

ज्यांना जनतेने भरभरुन दिलेले ६० सांभाळता आले नाहीत, त्यांच्या पदरी शेवटी २० आले. आता ते २० सांभाळून ठेवा नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील. घराबाहेर पडा, लाेकांची कामे करा, थोडे पैसे खर्च करा, असा टोलाही लगावला. उद्धव ठाकरे यांना आता जर विरोधी पक्ष नेते करायचा असेल, तर उरला सुरलेला पक्ष त्यांनी शरद पवार किंवा काँग्रेसमध्ये विलीन करावा. पक्ष विलीन करून विरोधी पक्षनेते पद घ्यावं, असे जठार म्हणाले.

Web Title: otherwise there will be zero leaving only two BJP leader Pramod Jathar criticizes Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.