..अन्यथा कोकणसाठी महाराष्ट्र उठवू!, राष्ट्रीय महामार्ग विभागाला मनसे नेत्यांचा इशारा

By संदीप बांद्रे | Published: October 19, 2023 07:01 PM2023-10-19T19:01:14+5:302023-10-19T19:01:50+5:30

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गंभीर नाहीत. अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळेच बहादूर शेख नाका येथील ...

otherwise we will raise Maharashtra for Konkan, MNS leaders warn the National Highways Department | ..अन्यथा कोकणसाठी महाराष्ट्र उठवू!, राष्ट्रीय महामार्ग विभागाला मनसे नेत्यांचा इशारा

..अन्यथा कोकणसाठी महाराष्ट्र उठवू!, राष्ट्रीय महामार्ग विभागाला मनसे नेत्यांचा इशारा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गंभीर नाहीत. अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळेच बहादूर शेख नाका येथील उड्डाण पुलाची दुर्घटना घडली आहे. यापुढे कारभारात सुधारणा  न झाल्यास मनसेकडून कोकणासाठी अवघा महाराष्ट्र उठवू, असा इशारा मनसे नेत्यांनी गुरुवारी येथे दिला. याचवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दोन दिवसात मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

मनसे नेत्यांनी गुरूवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर धडक दिली असता तेथे अधिकारी उपस्थित नसल्याने ठिय्या मांडला. त्यानंतर सायंकाळी कार्यककारी अभियंत्यासमवेत मनसे नेत्यांची बैठक झाली. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, वैभव खेडेकर, संतोष नलावडे म्हणाले की, गेल्या १७-१८  वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम पूर्ण होत नसल्याने इतिहासात त्याची नोंद झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्ते, पूल इतके किलोमीटरचे बांधले असे नेहमी सांगतात. यशाचे श्रेय तुम्ही श्रेय घेता, तर मात्र अपयश कोणी घेयचं? हे तुमचंच अपयश आहे.

 मुंबई- गोवा महामार्गाला गडकरीचं नाव द्यावं, अशी आमची मागणी आहे. कोट्यवधी रुपयांचा पूल कोसळतो, ही मोठी दुर्घटना आहे. सरकारी अधिकारी, ठेकेदार कंपनी काय करत होती. या प्रकरणात नेमके दोषी कोण यावर कोणीही बोलायला तयार नाही.  नेते मंडळीची उत्तरे नरोबा- कुंजोबा अशी आहेत. वाशिष्ठी नदीवरील पुलावर लोखंडी सळयाबाबतचा मुद्दा उपस्थित करीत या लोखंडी सळ्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न उपस्थित केला. यापुढील काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात सुधारणा न झाल्यास मन सैनिक शांत गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. 

यावर कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव म्हणाले, सुरळीत वाहतूकीसाठी दोन दिवसात सर्व्हिस रोडच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. वाशिष्ठी पुलावरील कॉंक्रीटीकरणाची दुरूस्ती देखील तातडीने केली जाईल. मात्र जोवर केंद्रीय समितीची पाहणी होत नाही, तोवर उड्डाणपुलाच्या कामास सुरवात करता येणार नाही.

Web Title: otherwise we will raise Maharashtra for Konkan, MNS leaders warn the National Highways Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.