आईच्या चारित्र्यावर संशय, डोक्यात हातोडा घालून मुलाने केला पित्याचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:52 PM2022-03-23T12:52:58+5:302022-03-23T12:53:22+5:30

रवींद्र याला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बोलत असे. एवढेच नव्हे तर आपल्या अल्पवयीन मुलाला सातत्याने हिणवत होता.

Out of anger over the mother's character, the son murdered his father in Lanja | आईच्या चारित्र्यावर संशय, डोक्यात हातोडा घालून मुलाने केला पित्याचा खून

आईच्या चारित्र्यावर संशय, डोक्यात हातोडा घालून मुलाने केला पित्याचा खून

Next

लांजा : आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्याच्या रागातून मुलाने आपल्या पित्याच्या डोक्यात हातोडा घालून खून केला. रवींद्र रावजी कांबळे (वय-४०, रा. पूनस) असे मृताचे नाव आहे. ही घटना काल, सोमवारी (दि.२१) लांजा तालुक्यातील पुनस येथे घडली. या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पूनस येथील रवींद्र रावजी कांबळे हा ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कामाला होता. त्याची पत्नी आशासेविका म्हणून काम करते. रवींद्र याला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बोलत असे. एवढेच नव्हे तर आपल्या अल्पवयीन मुलाला सातत्याने हिणवत होता.

सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान रवींद्र हा घरी आला आणि तो पत्नीला बोलू लागला. त्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. रागाने पत्नी घराच्या मागच्या बाजूला जाऊन बसली. त्याचवेळी तेथे असलेल्या आपल्या मुलाला उद्देशून रवींद्र याने बाेलण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुलाला राग अनावर झाला आणि त्याने घरामध्ये असलेल्या लोखंडी हातोड्याने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूला प्रहार केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

घराच्या मागच्या बाजूला बसलेल्या पत्नीला याबाबत काहीच माहिती नव्हते. राग शांत झाल्यानंतर ती घरात आली असता रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला. तिने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत, रवींद्र याला उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी, रात्री २ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, पोलीस हेडकाॅन्स्टेबल अरविंद कांबळे, राजेंद्र कांबळे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर, विजयकुमार चावरे, दिनेश आखाडे, भालचंद्र रेवणे, होमगार्ड याच्यासमवेत पूनस येथे दाखल झाले. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करीत आहेत

Web Title: Out of anger over the mother's character, the son murdered his father in Lanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.