जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, ११६ पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:30 AM2021-03-28T04:30:21+5:302021-03-28T04:30:21+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक झाला असून गेल्या २४ तासांत ११६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आला आहे. ...
रत्नागिरी : जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक झाला असून गेल्या २४ तासांत ११६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आला आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०,७३३ झाली आहे. एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला असून, मृतांची सख्या ३७२ झाली आहे. ४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण ९९५१ रुग्ण बरे झाले आहेत.
ऐन शिमगोत्सवात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वर्षभराच्या कालावधीत मार्च, २०२१ मध्ये सर्वांत जास्त ७५९ पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर तपासणीतील ८२ रुग्ण, तर ॲन्टिजेन तपासणीतील ३४ रुग्ण आहेत. रत्नागिरी तालुक्यात कोरोनाने कहर केला असून दिवसभरात ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून चिपळूण तालुक्यातही २८ कोरोनाबाधित सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दापोली तालुक्यात ८, गुहागरमध्ये १३, मंडणगडात ५, लांजात १, राजापूरमध्ये ४ आणि खेड, संगमेश्वरमध्ये प्रत्येकी ७ रुग्णांचा समावेश आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्याने गृहविलगीकरणात १७६ कोरोना रुग्ण, तर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ३३४ रुग्ण उपचार घेत आहेत.
आठ दिवसांच्या कालावधीनंतर चिपळुणातील एका ३२ वर्षीय तरुणाचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे कोरोनाबाधित मृतांची सख्या ३७२ झाली असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण ३.४६ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७१ टक्के आहे.
चौकट-
रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा कहर झाला आहे. दिवसेंदिवस तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दिवसभरात ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.