छाेटे जंगल निर्माण करून ‘ऑक्सिजन पार्क’ उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:31+5:302021-06-09T04:39:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : काेराेनाच्या काळात ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे़ पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे़ ...

Oxygen Park | छाेटे जंगल निर्माण करून ‘ऑक्सिजन पार्क’ उभारणार

छाेटे जंगल निर्माण करून ‘ऑक्सिजन पार्क’ उभारणार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : काेराेनाच्या काळात ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे़ पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे़ त्यामुळे छोटे छोटे जंगल निर्माण करून त्याला ‘ऑक्सिजन पार्क’ असे नाव देण्यात येणार असल्याचे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाइन परिषदेत ठरविण्यात आले आहे़

राज्यभरातील कृतीशील पर्यावरणप्रेमी शिक्षकांचे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे संघटन असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाइन परिषद आयोजित केली होती. यामध्ये राज्यातील विविध ठिकाणच्या प्रमुख प्रतिनिधींसह राज्य महिला सखी मंचच्या प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या.

सुरुवातीला या मंडळाने सायरा एज्युकेशन पुणे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पर्यावरण पीपीटी स्पर्धेत १०६ पर्यावरण पीपीटी आलेल्या होत्या. त्या स्पर्धेचा निकाल विशाल कांबळे यांनी आभासी वातावरणात स्क्रीनवर प्रमाणपत्र शेअर करून जाहीर केला. यात अनुक्रमे सुभाष नारकर पन्हाळा कोल्हापूर, कीर्ती मोरे भिवंडी ठाणे, वंदना कोरपे चिंचवड ठाणे हे विजेते ठरले. प्रदीप भाकरे कोपरगाव अहमदनगर आणि दत्ता लोकरे भिवंडी ठाणे यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले.

यावेळी पर्यावरण मंडळाचे राज्य सचिव आणि कोकणातील लेखक धीरज वाटेकर यांनी ‘पर्यावरण मंडळाची वाटचाल आणि आगामी भूमिका’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी कोणत्या क्षेत्रात कोणती झाडं लावावीत, याची संकलित केलेली माहिती महत्त्वाची आहे. नूतन बांदेकर यांनी लिहिलेल्या लेखांचे त्यांनी कौतुक केले. धीरज वाटेकर यांनी यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम ही ‘इको सिस्टम रिस्टोरेशन’ असल्याचे सांगितले. आजूबाजूच्या परिसंस्थांचं पुनरुज्जीवन, पुनर्निर्माण, पुनर्वसन करण्याचा विचार या मागे असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Oxygen Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.