किडींमुळे लांजातील भातशेती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 07:15 PM2017-10-14T19:15:02+5:302017-10-14T19:19:20+5:30
भातशेती परिपक्व होऊन कापण्यायोग्य झाली असताना लांजा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने भातावरती किडींचा पादुर्भाव होत आहे. यामुळे रिंगणे परिसरातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लांजा , दि. १४ : भातशेती परिपक्व होऊन कापण्यायोग्य झाली असताना लांजा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने भातावरती किडींचा पादुर्भाव होत आहे. यामुळे रिंगणे परिसरातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावून घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जून व जुलै महिन्यात लागवड केले जाणारे भातपीक आॅक्टोबर महिन्यामध्ये परिपक्व होऊन कापण्या योग्य होते. आॅक्टोबर महिन्यात भातपीक कापण्यास सुरूवात होते. मात्र, यावर्षी अजूनही पावसाचे थैमान सुरूच आहे. पावसाच्या पाण्यामुळे पिकांवरती किंडींचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने शेतकरी हताश झाला आहे.
लांजा तालुक्यातील रिंगणे गावातील हांदे वाडी, पाटीलवाडी व रिंगणे कोंड, कोंडगे गावातील खोरगाव व गुरववाडी, कुरंग गावातील बांधवाडी, बौध्दवाडी व कदमवाडी येथील भातपिकावरती किडींचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. मिळेल तेवढे भात जमविण्याचा आटोकाट प्रयत्न येथील शेतकरी करत आहे.