रत्नागिरी केंद्रात ‘प्यादी’ अव्वल
By admin | Published: December 1, 2014 10:43 PM2014-12-01T22:43:49+5:302014-12-02T00:25:33+5:30
राज्य नाट्य स्पर्धा : रत्नागिरीच्या संकल्प कला मंचची बाजी
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील प्राथमिक फेरीत संकल्प कला मंचने सादर केलेल्या ‘प्यादी’ नाटकासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. स्पर्धेत रत्नागिरीने बाजी मारली असून, व्दितीय क्रमांक गणेशगुळेच्या (ता. रत्नागिरी) अजिंक्यतारा थिएटर्सने सादर केलेल्या ‘मेला तो शेवटचा होता’ तर तृतीय क्रमांक बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाने सादर केलेल्या ‘या व्याकुळ संध्यासमयी’ नाटकाला जाहीर झाला आहे.
प्रथम क्रमांक पटकावलेल्या ‘प्यादी’ नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून, नाटकाला रोख २० हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. ‘मेला तो शेवटचा होता’ नाटकाला रोख १५ हजार, तर ‘व्याकुळ संध्यासमयी’ नाटकाला रोख १० हजार रूपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक रोख १०,००० रूपये विनोद वायंगणकर (प्यादी), व्दितीय पारितोषिक ५००० रूपये दशरथ रांगणकर (मेला तो शेवटचा होता) यांना जाहीर झाले आहे. नेपथ्याचे प्रथम पारितोषिक चिन्मय रांगणकर (मेला तो शेवटचा होता), व्दितीय क्रमांक नंदकुमार भारती (प्यादी) यांना जाहीर झाले आहे.
प्रकाश योजनेचे प्रथम बक्षीस श्याम चव्हाण (गोष्ट एका शाळेची), व्दितीय क्रमांक विलास जाधव (या व्याकुळ संध्यासमयी) यांना, तर रंगभूषेत प्रथम क्रमांक सत्यजीत गुरव (खेळ) व व्दितीय क्रमांक ओंकार पेडणेकर (मेला तो शेवटचा होता...) यांना मिळाला आहे. प्रथम क्रमांक विजेत्याला रोख ५००० तर व्दितीय क्रमांकाला तीन हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक व रोख ३००० रूपये गोपाळ जोशी (सुखांशी भांडतो आम्ही) व प्रज्ञा चवंडे (प्यादी) यांना जाहीर झाले आहे.
अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र रक्षिता पालव (मेला तो शेवटचा होता...), पूजा जोशी (प्यादी), पूनम चांदोरकर (खेळ), सायली सुर्वे (या व्याकुळ संध्या समयी) दीपक कीर (काळोख देत हुंकार) योगेश हातखंबकर (गोष्ट एका शाळेची) अथर्व आंब्रडकर (मेला तो शेवटचा), सागर चव्हाण (गोष्ट एका शाळेची) यांना देण्यात येणार आहेत.
वि. दा. सावरकर नाट्यगृहात झालेल्या प्राथमिक फेरीत एकूण १६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विश्वास देशपांडे, सुरेश बारसे व मानसी राणे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)