चिपळूण रोटरॅक्ट क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:28+5:302021-07-22T04:20:28+5:30

अडरे : चिपळूण रोटरॅक्ट क्लबतर्फे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना बक्षीस तसेच ...

Painting competition by Chiplun Rotaract Club | चिपळूण रोटरॅक्ट क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा

चिपळूण रोटरॅक्ट क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा

Next

अडरे : चिपळूण रोटरॅक्ट क्लबतर्फे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्यांना बक्षीस तसेच प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

दहा ते सतरा आणि अठरा ते पंचवीस अशा दोन वयोगटांत ही स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही गट मिळून सुमारे दीडशे स्पर्धकांनी सहभाग घेतला. दोन्ही गटातील पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षीस व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. लहान गटातील आठ तर मोठ्या गटातील तीन स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात आले. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रोटरी शताब्दी हॉल, चिपळूण येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपरान्त हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. दिगंबर तेंडुलकर, रोटरी अध्यक्ष प्रसाद सागवेकर, प्रशांत देवळेकर, डॉ. चिनार खातू, राहुल रेडीज, नितीन देवळेकर, पराग बांद्रे, अपरान्तचे अमर भोसले, कांबळे, चंदनशिवे उपस्थित होते.

दहा ते सतरा या वयोगटात यशवर्धन रेडीज, सिध्दी रेडीज आणि जान्हवी जाधव यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. दुसऱ्या गटात श्रुती सकपाळ, माधुरी बोंडकर व मनाली साळवी यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. परीक्षक म्हणून कोमल आगवेकर, पारिजात कुट्टन आणि कृष्णमूर्ती कुट्टन यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरॅक्ट अध्यक्ष सिद्धेश जाधव, सचिव आकाश रेडीज, प्रोजेक्ट चेअरमन दसुरकर यांच्या नेतृत्वाखाली सदस्य समरीन घारे, सर्फराज मेमन, ओंकार ओतारी, सिध्देश ओतारी, अक्षय ओतारी, श्लोक साडविलकर, मिहीर सागवेकर, आर्या रेडीज यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुल जाधव यांनी केले.

Web Title: Painting competition by Chiplun Rotaract Club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.