खेडमध्ये भटक्या श्वानांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:35 AM2021-08-12T04:35:49+5:302021-08-12T04:35:49+5:30

खेड : शहरात मोकाट जनावरांसह गाढवांचा मुक्त संचार सुरू असतानाच भटक्या श्वानांची भर पडल्याने नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. शहरात ...

Panic of stray dogs in Khed | खेडमध्ये भटक्या श्वानांची दहशत

खेडमध्ये भटक्या श्वानांची दहशत

googlenewsNext

खेड : शहरात मोकाट जनावरांसह गाढवांचा मुक्त संचार सुरू असतानाच भटक्या श्वानांची भर पडल्याने नागरिक कमालीचे धास्तावले आहेत. शहरात भररस्त्यात मोकाट श्वानांच्या झुंडीच्या झुंडी वावरत असल्याने नागरिकांना घाबरतच मार्गक्रमण करावे लागत आहे. या श्वानांच्या बंदोबस्तासाठी नगर परिषद प्रशासन काहीच उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शहरात मोकाट जनावरांच्या वावरामुळे आधीच नागरिक हैराण झाले आहेत. भटक्या गाढवांचाही मुक्त वावर सुरू आहे. यापाठोपाठ श्वानांचाही दहशत वाढल्याने नागरिकांच्या मनस्तापात आणखी भर पडली आहे. भररस्त्यातून श्वानांच्या झुंडीच्या झुंडी येत असल्याने मार्गस्थ व्हायचे कसे, असा प्रश्न साऱ्यांनाच सतावत आहे. मंदिरासभोवतालच्या परिसरातही श्वानांचा वावर कायम असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील काही भागांमध्ये श्वानांकडून हल्ल्याचे प्रकारदेखील घडत आहेत. याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी दाखल करूनदेखील कुठलीच ठोस कार्यवाही केली जात नसल्याने नागरिकांची डोकेदुखी कायमच आहे. दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने मोकाट श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी निर्बीजीकरणाची मोहीम राबविली होती. सद्य:स्थितीत वाढत्या भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा एकदा निर्बीजीकरणाची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Panic of stray dogs in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.