माेफत प्रवेशाकडे पालकांची पाठ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:40+5:302021-07-12T04:20:40+5:30
तांत्रिक समस्यांसह, पालक अद्याप शहरात परतले नसल्याने प्रवेश रखडले मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : बालकांचा सक्तिचा व ...
तांत्रिक समस्यांसह, पालक अद्याप शहरात परतले नसल्याने प्रवेश रखडले
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : बालकांचा सक्तिचा व मोफत शिक्षण अधिकार (आरटीई) च्या नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया गेल्या महिन्यापासून सुरू आहे. आतापर्यंत ६६ टक्केच प्रवेश झाले असून, ३४ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया रखडली आहे.
जिल्ह्यातील ८६४ जागांसाठी ९३५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६०९ अर्ज निवडण्यात आले होते. आतापर्यंत ३९३ पालकांनी प्रवेश घेतला असून, २१२ प्रवेश अद्याप झालेले नाहीत. तांत्रिक अडचणी घेण्यात येत असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यामुळे मुदतवाढ दिली आहे.
आरटीईंतर्गत पहिलीसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया करण्यात येते. अद्याप गतवर्षीचे अनुदान प्राप्त झालेले नाही. शासनाच्या सूचनेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असली तरी अनुदान वेळेवर प्राप्त होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरून पाठपुरावा व्हावा.
- शिल्पा पटवर्धन, कार्याध्यक्षा, रत्नागिरी एज्युकेशन साेसायटी, रत्नागिरी.
दुसऱ्यांदा मुदतवाढ
लाॅटरी पध्दतीने प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या पालकांना निवड झालेल्या शाळेत प्रत्यक्षात प्रवेश घेण्यासाठी दिनांक ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, या काळात कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रवेशासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
n ऑनलाईन प्रणालीने प्रवेश निश्चित करण्यात तांत्रिक अडचणी
nप्रवेश प्रक्रियेत प्राप्त होणाऱ्या ओटीपीत तांत्रिक समस्या
n एकूण ६०९ अर्जांना मंजुरी
n जिल्ह्यात ३९३ प्रवेश प्रक्रिया पूर्ण
n जिल्ह्यातून एकमेव अर्ज नामंजूर
n तीन पालकांचा संपर्कच नाही
n अद्याप २१२ प्रवेश प्रलंबित
n ऑनलाईन प्रणालीने प्रवेश निश्चित करण्यात तांत्रिक अडचणी
nप्रवेश प्रक्रियेत प्राप्त होणाऱ्या ओटीपीत तांत्रिक समस्या
n एकूण ६०९ अर्जांना मंजुरी
n जिल्ह्यात ३९३ प्रवेश प्रक्रिया पूर्ण
n जिल्ह्यातून एकमेव अर्ज नामंजूर
n तीन पालकांचा संपर्कच नाही
n अद्याप २१२ प्रवेश प्रलंबित
कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन प्रणालीने प्रवेश निश्चित करत असताना ओटीपीत तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सातत्याने शाळेत प्रवेशासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत.
- शिवांगी पाटील, पालक, देवरूख
तांत्रिक समस्यांमुळे प्रवेशासाठी विलंब होत असल्याची दखल घेत शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. निवड यादीतील सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेश सुरळीत होईल.
- दिलीप रामाणी, पालक, रत्नागिरी
शालेयस्तरावर प्रत्यक्षात ऑनलाईन प्रणालीने प्रवेश निश्चित करण्यात तांत्रिक समस्या निर्माण होत आहेत. शिवाय कोरोनाकाळात गावाकडे गेलेले पालक शहरात परतलेले नाहीत.
- निशादेवी वाघमोडे,
शिक्षणाधिकारी, रत्नागिरी