पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जागरूक राहावे : चंद्रकांत लिंगायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:30 AM2021-03-19T04:30:25+5:302021-03-19T04:30:25+5:30

राजापूर तालुक्यातील पाचल येथील खापणे महाविद्यालयात चंद्रकांत लिंगायत यांनी मार्गदर्शन केले. लाेकमत न्यूज नेटवर्क पाचल : पालकांनी आपल्या पाल्याच्या ...

Parents should be aware of their child's bright future: Chandrakant Lingayat | पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जागरूक राहावे : चंद्रकांत लिंगायत

पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जागरूक राहावे : चंद्रकांत लिंगायत

Next

राजापूर तालुक्यातील पाचल येथील खापणे महाविद्यालयात चंद्रकांत लिंगायत यांनी मार्गदर्शन केले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

पाचल : पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी जागरूक राहावे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी प्रत्येक पालकाने सतर्क राहणे गरजेचे आहे, असे मत सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस चंद्रकांत लिंगायत यांनी व्यक्त केले. ते श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात पालक भेट कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

प्रास्ताविकपर मनोगतातून प्रा. बी.ए. कश्यप यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. तदनंतर विद्यार्थी कल्याण मंडळ व महिला विकास कक्ष यांच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या सुविधांचा आढावा प्रा.डॉ. एस.एस. वाघमारे यांनी घेतला. महिला विकास कक्ष व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पास सवलत व रोख रक्कम प्रदान करण्यात आली. यावेळी प्रा.डॉ. ए.डी. पाटील, शिष्यवृत्ती विभागप्रमुख प्रा. एस.एस. धोंगडे, बी.ए. कश्यप, राजेश चव्हाण यांनी मनाेगत व्यक्त केले. रायपाटण गावचे नूतन सरपंच महेंद्र गांगण यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पालकांमधून प्रसाद काकिर्डे यांनीही मनाेगत व्यक्त केले.

प्राचार्य डाॅ. पी.एस. मेश्राम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपली प्रगती केल्यास महाविद्यालयाची प्रगती होते व पालकांचेही नाव रोशन होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर राहावे. महाविद्यालयात कोरोना कालखंडात सुरू असलेल्या उपक्रमांसंबंधी माहिती देणे, हा या पालक भेटीचा हेतू असून पालकांनीही यापुढे जागरूकपणे माहिती घेऊन आपल्या पाल्याचा विकास साधावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.ए. कश्यप यांनी केेले. आभार प्रा. एन.जी. देवन यांनी मानले.

Web Title: Parents should be aware of their child's bright future: Chandrakant Lingayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.