रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी पासपोर्टची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:22 PM2018-08-12T23:22:36+5:302018-08-12T23:22:40+5:30

Passport facility for Ratnagiri-Sindhudurg | रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी पासपोर्टची सुविधा

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी पासपोर्टची सुविधा

Next

राजापूर : येथील पोस्ट कार्यालयात रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांच्या हस्ते झाले. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात हा कार्यक्रम पार पडला.
कोकणातील दोन जिल्ह्यांसाठी प्रथमच सुरू होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र्र, पुढील काही महिन्यांत सुरू होणारी विमानसेवा अशा विविध सुविधांमुळे येथील कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.
अलीकडच्या काळात कोकणचा विकास झपाट्याने होत आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळ सज्ज झाले असून, लवकरच तेथून विमान उड्डाण घेतील. कोकण रेल्वे मार्गावर सुधारणा होत आहेत. महामार्गाचे काम जोमाने सुरू आहे.
त्यानंतर आता कोकणात प्रथमच दोन जिल्ह्यांसाठी राजापूरमधील पोस्ट कार्यालयात टपाल पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होत असून, या सर्वांचे श्रेय हे खासदार विनायक राऊत यांना असल्याची भावना वायकर यांनी व्यक्त केली. त्यावेळी खासदार राऊत यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. राजापूर पंचायत समितीला नवीन सभागृह देणार असून, त्यासाठी ५० लाखांचा निधी देणार असल्याची पालकमंत्र्यांनी घोषणा केली.
दोन जिल्ह्यातील विमानतळांवरून विमानसेवादेखील लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणचा विकास जलदगतीने होणार असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. कोकणात पासपोर्ट सेवा केंद्र्र व्हावे, अशी मागील ३५ वर्षे मागणी होती पण ती काही केंद्र्र सरकारला पूर्ण करता आली नव्हती. मात्र ते शिवधनुष्य खासदार विनायक राऊत यांनी यशस्वीपणे पेलवले. साधारणपणे कोणत्याही विकासकामाला अधिकारीवर्गाची साथ नसेल, तर कामे खोळंबतात पण पासपोर्ट सेवा केंद्रासाठी संबंधित अधिकाºयांनी चांगले सहकार्य केले, याचा त्यांनी उल्लेख केला.
सेवेमुळे परदेशगमनाला जाणाºया सर्वांना आता पासपोर्टसाठी कुठेच जाण्याची गरज नाही. आता राजापुरातच ती सेवा सुरु झाली आहे. याबद्दल आमदार राजन साळवी यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित असणाºया पासपोर्ट विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी पासपोर्ट सेवेबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्यानुसार देशात सध्या ३६ पासपोर्ट कार्यालये असून, ९२ सेवाकेंद्रे व २१५ पीओपीएससी सेवा सुरु असल्याची माहिती दिली. देशात वर्षाला सात ते आठ लाख नवीन पासपोर्ट काढले जातात, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, स्थानिक आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, विधानपरिषद सदस्य अ‍ॅड. हुस्नबानु खलिफे, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, राजापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, सभापती अभिजित तेली, मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट सेवेच्या अधिकारी स्वाती कुलकर्णी, पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्राचे डॉ. एन. विनोदकुमार, माजी आमदार गणपत कदम, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, महिला आघाडीच्या शिल्पा सुर्वे, तहसीलदार प्रतिभा वराळे, उपसभापती प्रशांत गावकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिलकुमार करगुटकर यासह पोस्ट कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बीएसएनएल अधिकाºयांशी चर्चा करणार
सर्व प्रयत्न सुरू असताना संबंधित अधिकाºयांनीदेखील चांगले सहकार्य केल्यामुळे कोणतीच अडचण आली नाही. कोकणात प्रथमच पासपोर्ट सेवा केंद्र्र सुरु झाले असून त्यांना ‘कनेक्टिव्हीटी’ची अडचण येऊ नये म्हणून मुंबईतील ‘बीएसएनएल’च्या अधिकाºयांशी आपण चर्चा करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Passport facility for Ratnagiri-Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.