देवरूख पाेलिसांनी घेतले पाटगाव दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:24 AM2021-05-30T04:24:56+5:302021-05-30T04:24:56+5:30
देवरुख : देवरुख पोलीस प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटगाव हे गाव दत्तक घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी दिली ...
देवरुख : देवरुख पोलीस प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटगाव हे गाव दत्तक घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून गाव दत्तक योजना पुढे आली आहे. ही योजना संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस स्थानकांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. देवरुख पोलीस स्थानकातर्फे पाटगाव दत्तक घेण्यात आले आहे. देवरुखनजीक देवरुख - रत्नागिरी मार्गावर पाटगाव वसलेले असून, गावाची लोकसंख्या १ हजार ७१२ इतकी आहे. कोरोनाने सध्या थैमान घातले आहे. जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस प्रशासनाने पाटगाव दत्तक घेतले आहे.
या याेजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांचे तापमान व ऑक्सिजन पातळीची तपासणी करण्यात आली. तसेच लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी केली जाणार आहे. पोलीस निरीक्षक मारूती जगताप, पोलीस कॉन्स्टेबल सुजाता सावंत, रिलेश कांबळे व होमगार्ड प्रज्याेत सावंत यांनी घरोघरी जाऊन मास्क दिले तसेच तापमान व ऑक्सिजनची तपासणीही केली.