रुग्णांना घरी न साेडता अर्ध्या रस्त्यातच उतरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:48+5:302021-06-06T04:23:48+5:30
राजापूर : कोविड सेंटरमधून घरी सोडण्यात येणाऱ्या रूग्णांना रूग्णवाहिकेतून अर्ध्या रस्त्यातच उतरवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार राजापूर तालुक्यात घडला. ...
राजापूर : कोविड सेंटरमधून घरी सोडण्यात येणाऱ्या रूग्णांना रूग्णवाहिकेतून अर्ध्या रस्त्यातच उतरवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार राजापूर तालुक्यात घडला. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आरोग्य विभागाच्या या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील कोविड सेंटरमध्ये कोंडतिवरे येथील ३ कोरोनाबाधित रूग्ण दाखल होते. त्याठिकाणी ६ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. रायपाटण कोविड सेंटरमधून रूग्णवाहिकेतून या तिघांनाही पाठविण्यात आले. मात्र, रूग्णवाहिकेतून घरी न सोडता, ओणी - गोरूलेवाडी येथे रस्त्यातच उतरविण्यात आले. लाॅकडाऊनमुळे अन्य कोणत्याही वाहनाची व्यवस्था नसल्याने या तिघांनाही त्याठिकाणी ताटकळत राहावे लागले. या तिघांमध्ये एक ८४ वर्षांचे वयोवृध्द तसेच एका महिलेचा समावेश आहे. त्यांना अशाप्रकारे अर्ध्या रस्त्यात सोडण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.