सांस्कृतिक केंद्र कामाच्या चौकशीनंतरच बिल द्या, शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 03:26 PM2021-01-05T15:26:14+5:302021-01-05T15:27:53+5:30

Natak culture Ratnagiri- माजी आमदार रमेश कदम यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नाट्यरसिकांसाठी खुले करा, अशी मांडलेली भूमिका अत्यंत रास्त आहे. मात्र, सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीचे काम करताना चार आण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, अशा पद्धतीने काम झाले आहे. त्यानंतर केंद्र सुरू केले तरी, चौकशीशिवाय संबंधित ठेकेदारास बिल अदा करू नये, अशी भूमिका नगरसेवक व शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी मांडली आहे.

Pay the bill only after inquiring about the cultural center work | सांस्कृतिक केंद्र कामाच्या चौकशीनंतरच बिल द्या, शिवसेनेची मागणी

सांस्कृतिक केंद्र कामाच्या चौकशीनंतरच बिल द्या, शिवसेनेची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांची मागणीसांस्कृतिक केंद्र सुरू व्हायला हवे

चिपळूण : माजी आमदार रमेश कदम यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र नाट्यरसिकांसाठी खुले करा, अशी मांडलेली भूमिका अत्यंत रास्त आहे. मात्र, सांस्कृतिक केंद्राच्या दुरुस्तीचे काम करताना चार आण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, अशा पद्धतीने काम झाले आहे. त्यानंतर केंद्र सुरू केले तरी, चौकशीशिवाय संबंधित ठेकेदारास बिल अदा करू नये, अशी भूमिका नगरसेवक व शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी मांडली आहे.

शहरातील गेल्या दहा-बारा वर्षांपासून बंद असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची नव्याने दुरूस्ती झाली. त्यावर कोट्यवधीचा खर्चही झाला. या वाढत्या खर्चावरून तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत नगरसेवक सकपाळ म्हणाले की, सांस्कृतिक केंद्राचे काम चुकीच्या पद्धतीने काम झाले आहे. त्यामुळे त्यांची चौकशी व्हायला हवी. ही चौकशी सुरू राहील. यादरम्यान सांस्कृतिक केंद्राचे अत्यंत थाटामाटात उद्घाटन होऊ दे. त्याला आमचा विरोध राहणार नाही.

सांस्कृतिक केंद्र सुरू व्हायला हवे. करोडो रुपये खर्च करून एक सुंदर वास्तू उभी राहिली आहे, फक्त चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामाला आमचा आक्षेप आहे. त्यामुळे २६ जानेवारीला थाटामाटात उद्घाटन करा. मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नका, असे ते म्हणाले.

पारावर कला सादर करून मूक आंदोलन सुरूच

गेल्या काही दिवसांपासून शहरातील कलाकार मंडळी पारावरच कला सादर करत एकप्रकारे पालिकेच्या विरोधात मूक आंदोलन करत आहे. त्याची दखल घेऊन आतातरी राजकारण बाजूला सोडा आणि हे सांस्कृतिक केंद्र सुरू करा, अशी भावना शहरवासीयांमधून उमटू लागल्या आहे.
 

Web Title: Pay the bill only after inquiring about the cultural center work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.