संगमेश्वरात दुसऱ्या दिवशीही शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:29 AM2021-04-12T04:29:08+5:302021-04-12T04:29:08+5:30
देवरुख बसस्थानकात शुकशुकाट पसरला हाेता. (छाया : सचिन मोहिते) लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : संगमेश्वर तालुक्यात वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या ...
देवरुख बसस्थानकात शुकशुकाट पसरला हाेता. (छाया : सचिन मोहिते)
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला. मेडिकल आणि पेट्रोल पंप वगळता सर्वच दुकाने बंद होती. प्रवाशांची वर्दळ कमी असल्याने आगारामध्ये पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळाला.
संगमेश्वर तालुक्यातील माखजन, कडवई, आरवली, साखरपा या बाजारपेठेत कडक लॉकडाऊन पाळण्यात आले. रविवारी काही प्रमाणात ग्रामीण भागातील तुरळक वाहतूक सुरू हाेती.
देवरुख पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, संगमेश्वरचे उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात रविवारीही ठिकठिकाणी नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मार्लेश्वर तिठा येथे वाहनांची तपासणी करण्यात येत होती. मास्क नसलेल्यांवर कारवाई करण्यात येत होती.
चाैकट
वीकेंड लॉकडाऊनला शनिवारी चार आणि रविवारी चार, अशा आठ एस. टी.च्या फेऱ्या देवरुख आगारातून सोडण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रक यांनी दिली. देवरुख ते रत्नागिरी, देवरुख ते संगमेश्वर, देवरुख ते साखरपा आणि बोरिवली या चार फेऱ्याच सोडण्यात आल्या. या बस ना केवळ शंभर रुपयांच्या आसपास भाडे मिळाले आहे.