म्हाप्रळच्या दोन वाळूमाफियांना दंड

By admin | Published: November 18, 2014 09:53 PM2014-11-18T21:53:19+5:302014-11-18T23:22:49+5:30

महसूल खाते : धडक कारवाईत ७७ ब्रास वाळूचा अनधिकृत साठा जप्त

Penalties for two of Walhupal's MPs | म्हाप्रळच्या दोन वाळूमाफियांना दंड

म्हाप्रळच्या दोन वाळूमाफियांना दंड

Next

मंडणगड : मंडणगड तहसील कार्यालयाच्यावतीने मंगळवारी म्हाप्रळ येथे वाळू माफियांच्या विरोधात केलेल्या धडक कारवाईत एक सक्शन पंप ताब्यात घेऊन पाण्यात बुडवण्यात आला. तसेच ७७ ब्रास वाळूचा अनधिकृत साठा केल्याप्रकरणी दोघांविरोधात ७७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यासंदर्भात तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार म्हाप्रळ येथे खाडीपात्रात अनधिकृत वाळूउपसा सुरु असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी मंगळवारी सकाळी तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचाऱ्यांचे पथक रवाना झाले होते.
या पथकाने म्हाप्रळ रेती बंदर या ठिकाणी केलेल्या कारवाईत उमर मुकादम यांच्या प्लॉटजवळ १ सक्शन पंप ताब्यात घेऊन पाण्यात बुडवण्यात आला़ मुकादम यांच्या प्लॉटवर ५५ ब्रास वाळूचा साठा आढळून आला. वाळूचा अनधिकृतपणे साठा केल्याने मुकादम यांच्यावर ५५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली़
याचबरोबर नियाज मांडलेकर यांच्या प्लॉटवर २२ ब्रास वाळूचा अनधिकृत वाळूसाठा आढळून आला. त्याच्याविरोधात २२ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. महसूल विभागाने केलेल्या कारवाईत निवासी नायब तहसीलदार विकास गारुडकर, सर्कल, तलाठी ए. के. पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, सक्शनच्या मदतीने वाळू उपसा करण्यासाठी राज्यात कोठेही परवानगी नसताना म्हाप्रळ येथे सक्शन पंपाच्या मदतीनेच वाळूउपसा होत असल्याचे वेळोवेळी सिध्द झाले आहे. ही बाब उघड होऊनही येथील महसूल विभाग संबंधितांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास धजावत नाही. त्यामुळे एकूणच ही कारवाई दिखाऊ असल्याचा सर्वसामान्य जनतेचा समज असल्याने प्रशासनाबाबत नाराजीचे वातावरण आहे़ (प्रतिनिधी)

दोघांना ७७ हजार रुपयांंचा दंड.
तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई.
अनधिकृत वाळूसाठा केल्याने मुकादम यांना ५५ हजारांचा दंड
नियाज मांडलेकर यांना २२ हजाराचा दंड.

Web Title: Penalties for two of Walhupal's MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.