विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:32 AM2021-04-04T04:32:33+5:302021-04-04T04:32:33+5:30
‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ अंतर्गत मार्गदर्शन दापोली : दापोली शिक्षणसंस्था संचलित दापोली ए.जी. हायस्कूल प्रशालेमध्ये केंद्र शासनामार्फत बेटी बचाओ ...
‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’ अंतर्गत मार्गदर्शन
दापोली : दापोली शिक्षणसंस्था संचलित दापोली ए.जी. हायस्कूल प्रशालेमध्ये केंद्र शासनामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ करिअर मार्गदर्शनांतर्गत उद्बोधन वर्ग घेण्यात आला. हा कार्यक्रम पंचायत समिती दापोली शिक्षण विभाग यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे कुणाल मंडलिक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक सुधाकर शेळके यांनी प्रास्ताविक केले.
अनुजा चव्हाण यांचा राजीनामा फेटाळला
चिपळूण : शिवसेनेच्या रामपूर पंचायत समिती गणातील सदस्य अनुजा चव्हाण यांनी दिलेला सदस्यत्वाचा राजीनामा विहित नमुन्यात नसल्याने तो फेटाळण्यात आला आहे. चव्हाण यांनी प्रभारी सभापती पांडुरंग माळी यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी हा राजीनामा दिला होता. माळी यांनी त्यांच्या राजीनाम्याचे पत्र शिवसेनेचे गटनेते राकेश शिंदे यांच्याकडे पाठवले आहे.
खवटीत धावला टँकर
खेड : तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत घटत चालले असून, गुरुवारपासून खवटी वरची धनगरवाडी येथे जिल्ह्यातील पहिला टँकर धावण्याची परंपरा कायम ठेवलेली असताना खवटी वरची धनगरवाडी येथील २ वाड्यांचे अर्ज दाखल झाल्याने पुन्हा शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही शासकीय टँकर धावला. तालुक्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्याने पाणीटंचाईचे संकट ग्रामीण भागातील धनगरवाड्यांमध्ये निर्माण झाले आहे.